भोडणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ धनश्री संतोष जगताप व उपसरपंच पदी मल्हारी रामचंद्र लोखंडे यांची निवड..!!
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भोडणी गावचे नूतन सरपंच व सदस्य यांचा सत्कार करून अभिनंदन केले
इंदापूर : ( प्रतिनिधी )
भोडणी ग्रामपंचायतीच्या आज (दि.१०) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सौ धनश्री संतोष जगताप या निवडून आल्या असून उपसरपंचपदी मल्हारी रामचंद्र लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी .जी .कापसे यांनी जाहीर केले.
भोडणी ग्रामपंचायत मध्ये एकूण नऊ सदस्य निवडून आले त्यामध्ये पाच महिला व चार पुरुष आज (दि.१० फेब्रु. २०२१) रोजी सरपंच व उपसरपंच पदाची निवड शासनाने ठरवून दिलेल्या दिवशी घेतली असून सरपंच पद हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गास आरक्षित असल्याने (दि.१०) रोजी सकाळी १० ते दुपारी १२पर्यंत सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून सौ धनश्री संतोष जगताप व सौ शिवकन्या किशोर गोसावी या दोघांचे अर्ज प्राप्त झाले. त्याची छाननी केली व ते वैध ठरले. यानंतर गुप्त पद्धतीने मतदान घेतल्यानंतर सौ.धनश्री संतोष जगताप या ५ मते मिळवून विजयी झाल्या असे निवडणूक निर्णय अधिकारी पी. जी. कापसे यांनी जाहीर केले .
तसेच उपसरपंच पदासाठी श्री मल्हारी रामचंद्र लोखंडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला व तो वैध ठरला. त्यामुळे ते बिनविरोध निवडून आल्याचे आर जी कापसे अधिकारी यांनी जाहीर केले.
भोडणी ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत चुरशीने लढवली गेली. सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील सौ.धनश्री संतोष जगताप, मल्हारी रामचंद्र लोखंडे यांच्या निवडीमुळे भोडणी ग्रामस्थ समाधान व्यक्त करताना दिसत होते.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सौ छाया अनिल शिंदे, सुनील बाळासो पवळ, सौ राधिका प्रशांत गोसावी, सौ.शोभा शिवाजी हांगे व शिवाजी हनुमंत हांगे, सौ. शिवकन्या किशोर गोसावी, संचित तानाजीराव हांगे पॅनल मधील सर्व मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी पी. जी. कापसे व सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरज पाटमास आणि ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी काम पाहिले.

