shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पी.एच.डी पदवी संपादन केल्याने प्रा.आत्माराम फलफले यांचा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला सन्मान..!!

पी.एच.डी पदवी संपादन केल्याने प्रा.आत्माराम फलफले यांचा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी   केला सन्मान..!!
    इंदापूर प्रतिनिधी:-(दि.५ फेब्रु.२१)
 इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. आत्माराम किसन फलफले यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा.आत्माराम फलफले यांनी पी.एच.डी पदवी संपादन केल्याने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.
    प्रा. फलफले यांनी भूगोल विषयात  इंदापूर तालुक्यातील ऊस शेतीचा भौगोलिक अभ्यास या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना भाई किसनराव देशमुख महाविद्यालय चाकूर येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. धनुश्वर आर. एस. यांनी मार्गदर्शन केले. 
  राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव मुकुंद शहा, नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रा. आत्माराम फलफले  यांचे अभिनंदन केले.
   यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, भूगोल विभाग प्रमुख प्रा. गजानन मेश्राम, डॉ. गजानन ढोबळे, नारायणदास रामदास प्रशालेचे मुख्याध्यापक विकास फलफले उपस्थित होते.
close