इंधन दरवाढीचा इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध..!!
इंदापूर प्रतिनिधी: (दि.५ फेब्रु.२१)इंदापूर येथील तहसील कचेरीसमोर इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारकडून वारंवार होत असलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा जाहीर निषेध असलेले निवेदन इंदापूर तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे देण्यात आले.
संपूर्ण जगासह महाराष्ट्र कोरोना काळानंतर जनतेचे जीवन पूर्ववत होत असताना केंद्र सरकार वारंवार पेट्रोल व डिझेलची दरवाढ करत असल्यामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे .सध्या वाढती महागाई बेरोजगारी व त्या बरोबर सातत्याने होणारी इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून त्याचा इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध इंदापूर तहसील कचेरीसमोर करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे ,सुदर्शन रणवरे, अरुण पवार ,संदीप चौधरी ,आप्पासाहेब डोंगरे ,सुदर्शन साखरे, मारुती खोपकर ,धणेश राऊत ,अंकुश गलांडे, पांडुरंग वाघ ,जहांगीर पठाण ,इत्यादी उपस्थित होते.

