shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीक्षेत्र जेजुरी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक नामकरण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू-आ. विद्याताई चव्हाण..!

राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आ. विद्याताई चव्हाण यांचे आश्वासन..!

शिर्डी (प्रतिनिधी): श्री क्षेत्र जेजुरी व सासवड परिसरात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांचे नाव देण्यासाठी आपण विशेष लक्ष घालून मुख्यमंत्री व महाविकास आघाडीकडे प्रयत्न करू असे आश्वासन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या व आमदार विद्याताई चव्हाण यांनी दिले.

आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 189 व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे आश्वासन दिले.

यावेळी आमदार संजय जगताप, जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ मीनाताई सोनवणे तसेच श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त जेजुरी चे प्रमुख विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे, विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त राजकुमार लोढा ,विश्वस्त शिवराज झगडे ,विश्वस्त पंकज निकुडे, विश्वस्त ऍड अशोक संकपाळ ,विश्वस्त तुषार सहाने, पीडीसीसी बँकेचे संचालक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, नगराध्यक्ष वीणाताई सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण हे होते.यावेळी आमदार विद्याताई चव्हाण यांनी आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांच्या प्रस्तावित चित्रपटाला अनुदान मिळवून देण्यासाठी तसेच उमाजी राजे यांचा इतिहास शालेय व महाविद्यालयीन पुस्तकात विस्तृत स्वरूपात यावा यासाठी आपण विशेष लक्ष घालून प्रयत्न करू, असे यावेळी त्यांनी आश्वासन दिले व यावेळी उमाजी राजांचा इतिहास विशद केला. 

कार्यक्रमात श्री मार्तंड देवस्थान जेजुरी चे प्रमुख विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे यांनी सांगितले की मागील वेळी आपण दिलेला शब्द पाळून गडावरील आद्य क्रांतिवीर उमाजी राजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सुशोभीकरण केले आहे व आपले आश्वासन पूर्ण केले आहे. तसेच समाजाच्या व नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या मागणीनुसार शेजारीच असणाऱ्या गडावरील प्रवेशव्दाराला  आद्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले.

यावेळी जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणाताई सोनवणे यांनी नगर परिषदेच्या वतीने येथील नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या आद्यक्रांतिकारक बहुउद्देशीय संस्कृतीक भवनला व परिसरामध्ये नगर परिषदेच्या वतीने विकास कामांसाठी मागेल ती मदत करण्यात येईल.असेही यावेळी त्यांनी आश्वासन देत आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले.

यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना, हसन मुश्रीफ यांनीही या कार्यक्रमात ऑनलाईन भाग घेऊन राजे उमाजी नाईकांच्या शौर्यगाथेचा गौरव करत  त्यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले, नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनीही यावेळी राजे उमाजी नाईकांचा इतिहास सांगितला व श्री मार्तंड देवस्थान तसेच नगरपरिषद व राज्य शासन समाजासाठी वेळोवेळी जी मदत करत आहे त्याबद्दल आभार मानत आम्ही मांडलेल्या मागण्या अजुनही आहेत व त्या पूर्ण कराव्यात अशीही मागणी यावेळी केली.

प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते जेजुरी गडावरील आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. 

या कार्यक्रमाला नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब नाईक, विश्वनाथ मचकुले, संतोष पाटोळे,बंडु बोडरे, तसेच विश्वस्त बाळासाहेब जाधव, जगन्नाथ मकर, आप्पा माकर, राज्य सरचिटणीस राजकुमार गडकरी, देवराम गुळवे, युवा नेते हर्षवर्धन चव्हाण, सौ मुक्ताताई चव्हाण, अशोकराव खोमणे, संपर्कप्रमुख राजेंद्र चव्हाण, सल्लागार बंडोपंत खर्डेगुरुजी, संजय शिरतार, संजय चव्हाण, सिताराम जेडगुले ,संजय मोरे, सुभाष जेडगुले ,शिवाजी गडकरी शरद खोमणे, विक्रम चव्हाण, बाळासाहेब जाधव आदींसह राज्यातील पदाधिकारी ,नेते, कार्यकर्ते व उमाजी प्रेमी उपस्थित होते.
close