shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या 189 व्या पुण्यतिथी निमित्त राजगुरूनगर येथे अभिवादन...!

विद्याधर साळवे:राजगुरूनगर प्रतिनिधी, दि.०४-०२-२०२१.
राजगुरूनगर येथील गढई मैदान व जि. प. प्राथ.शाळा मुलीची राजगुरूनगर क्र.2 येथे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची 189 वी पुण्यतिथी मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
     
जि.प.प्राथ.शाळेत श्री. दिपक शितोळे यांच्याहस्ते व गढई मैदान येथील प्रतिमेचे पूजन श्री. राहूल पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक श्रीम. इंदोरे मॅडम यांनी केले. मनोगत श्री. उत्तम पाषाणकर यांनी केले. आभार सौ. मंजुषा सहाणे यांनी मांडले.

सदर कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्री. गजानन परदेशी सर, मुख्या. सत्यवान शितोळे, उल्का शिंदे, वैजयंती थोरात, जयश्री आरुडे, सविता पवार, अशोक धनवटे, संकेत शितोळे, युवराज जाधव, बबन होले, अमोल धनवटे, पूनम धनवटे, आदित्य धनवटे, संतोष गाडेकर, पत्रकार विद्याधर साळवे , अमित खोमणे, प्रथमेश भंडलकर, गंगाराम गोफणे, संदिप गावडे, साईनाथ शितोळे, नगर सेवक सचिन मधवे, आप्पा भंडलकर, सुयश बोडरे उपस्थित होते.
close