जामखेड प्रतिनिधी(अनिल धोत्रे) :
जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथेस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत 01 हजार 380 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस काँस्टेबल प्रकाश वाघ यांच्या फिर्यादीवरून रज्जाक बशीर पठाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाजारतळावरील भुतवडा रोड या ठिकाणी सागर पान सेंटरवर मंगळवारी सायंकाळी धाड टाकली. या धाडीत 12 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान पोलिस काँस्टेबल रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून सचिन सोपान डिसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड काँस्टेबल शिवाजी भोस व पोलिस नाईक कोळपे हे करत आहेत.
या कारवाई मुळे मटका व्यवसाय आणि मावा ,गुटका व्यवसाय करणाऱ्याचे धाबे चांगलेच दणाणले आहे
या कारवाईच्या पथकात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हेड काँस्टेबल भाऊसाहेब कुरूंद,पो. काॅ रणजीत जाधव, संभाजी कोतकर,प्रकाश वाघ, जामखेड पोलिस स्टेशनचे हेड काँस्टेबल शिवाजी भोस, आबासाहेब आवारे, संग्राम जाधव यांचा समावेश होता.

