प्रतिनिधी : मोहन शेगर
सोनई : नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली सोनई ग्रामपंचायत सरपंच पदी धनंजय सखाराम वाघ यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी प्रसाद हारकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या महिन्यात १५ जानेवारी रोजी सोनई ग्रामपंचायत साठी मतदान झाले होत.
या वेळी जलसंधारण मंत्री नाम.शंकरराव गडाख यांच्या जगदंब विकास पॅनल व माजी.खा.तुकाराम गडाख यांच्या सोनई ग्रामविकास पॅनल मध्ये सरळ लढा होवुन जलसंधारण मंत्री ना.गडाख यांच्या गटाने १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवला होता तर माजी खा.तुकराम गडाख यांच्या पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
आज सोनई ग्रामपंचायत साठी सरपंच पदासाठी कार्यक्रम जाहिर निवडणुक अधिकारी गोकुळ नागरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी जि.प.सदस्य सुनिल गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचीत सदस्याची बैठक सोनई सोसायटी येथे झाली. यावेळी इच्छुक उमेद्वाराची मने जाणुन घेतली. यात सर्वानुमते धनंजय सखाराम वाघ यांची सरपंच पदा साठी सदस्य प्रभाकर गडाख यांनी नाव सुचवले. तर उपसरपंच पदासाठी प्रसाद बाळकृष्ण हारकळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व जि.प.सदस्य सुनिल गडाख सोनई सोसायटी चेअरमन विश्वासराव गडाख यांनी अभिनंदन केले.
परिसरातील ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंच पदासाठी निवडी झाल्या त्या पुढील प्रमाणे
बेल्हेकरवाडी - सरपंच: बेबी कानिफनाथ येळवंडे , उपसरपंच: दत्तात्रेय मारुती बेल्हेकर
खरवंडी - सरपंच: गोरख श्रीधर शिंदे, उपसरपंच: हर्षदा संतोष भोगे
मोरेचिंचोरे - सरपंच:जयश्री राजु मंचरे, उपसरपंच:बाळासाहेब एकनाथ मोरे
ब-हाणपुर - सरपंच: कुंदा शंकर चव्हाण, उपसरपंच:मोनिका सागर तावरे
लोहगाव - सरपंच: सुवर्णा अदिनाथ पटारे, उपसरपंच: विठ्ठल(बापुराव)रघुनाथ कल्हापुरे
शनिशिंगणापुर - सरपंच: सौ.पुष्पा बाळासाहेब बानकर, उपसरपंच:स्वप्नील बाळासाहेब बोरुडे
शिंगवेतुकाई - सरपंच: सतिष पांडुरंग थोरात, उपसरपंच:सौ.सुनिता संतोष पुंड
निंभारी - सरपंच:सौ. भागिरथी चंद्रकांत पवार, उपसरपंच: आशा रामदास माळी
लांडेवाडी - सरपंच: निशा गणेश दरंदले, उपसरपंच: संजय पद्माकर दरंदले
वांजोळी -सरपंच:सोनाली कृष्णा खंडागळे, उपसरपंच:मंगेश नवनाथ पागीरे.

