खर्डा । प्रतिनिधी (अनिल धोञे):
जामखेड तालुक्यातील खर्डा हे गाव
मराठवाड्याच्या सरहद्दीवर व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावरील महत्त्वाचे शहर ओळखले जाते.
यावेळी खर्डा येथे अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नव्याने पोलीस स्टेशन, पोलीस वसाहत आदि इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठी पाहणी केली. खर्डा येथे नवीन पोलीस इमारत व पोलीस स्टेशनची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. लवकरच होणार अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.
मराठवाड्याचे प्रवेशद्वार व जिल्ह्याच्या सरहद्दीवर गाव असल्याने गुन्हेगारांचे प्रमाण खर्डा शहर व परिसरामध्ये चोऱ्या, दरोडे, खून, खुनाचे प्रयत्न,हाणामारी, महिला व मुलींना छेडछाड,रस्ता लूट आदी विविध अवैध धंदे व गुन्हे घडत असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षितेसाठी लोकप्रतिनिधींकडे नवीन पोलीस स्टेशनची मागणी केली होती.
परंतु अनेक वर्षापासून ही मागणी लाल फितीतच् अडकली की काय असा प्रश्न नागरिक सतत चर्चा करताना दिसून येतात. परंतु गुरुवार आठवडे बाजार रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जुनी मोडकळीस आलेली पोलीस चौकी इमारत व जागेची पाहणी करून संबंधित विभागाला माहिती देऊन लवकरच इमारतीत दुरुस्ती व पोलीस स्टेशन चालू करण्याचे माहिती उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आले.
२६ जानेवारीला २०२१ ला पोलीस स्टेशन तात्पुरते भाडे जागेत नवीन चालू होणार अशी चर्चा मोठ्या कुतूहलाने करताना दिसून आले. यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ग्रामस्थांना नवीन पोलीस स्टेशन ची उत्सुकता लागली असताना २६ जानेवारीला २०२१ रोजी नवीन पोलीस स्टेशन इमारत उद्घाटन न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये निराशा पसरली.
परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जागेची पाहणी करून माहिती घेतली असता ग्रामस्थांमध्ये नवीन पोलीस स्टेशन होणार अशा पल्लवित झाल्या आहेत.परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने खर्डेयाचे पोलीस स्टेशन कधी चालू होणार हाच प्रश्न नागरिक सतत चर्चेत करताना दिसून येतात. नविन पोलिस स्टेशन झाल्यावर गुन्हेगारीवर नियंत्रण बसेल व नागरिकांच्या सुरक्षतेत वाढ होईल अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.
खर्डा पोलीस स्टेशन पोलीस चौकी मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच संजय गोपाळघरे, शिवकुमार गुळवे व दत्ता भोसले यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कर्जत जामखेड उपविभागीय पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव,जामखेड पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे, पोलिस कॉन्स्टेबल शेषराव म्हस्के, मनोज साखरे,अविनाश ढेरे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

