shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीचा शिवसेना महिला आघाडीने केला निषेध..!!

प्रतिनिधी । मोहन शेगर:
कल्याण - मागील काही दिवसात पेट्रोलचे भाव शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले असून त्याच पटीत डिझेल आणि आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती देखील भरमसाठ वाढवल्या गेल्या आहेत.

शिवसेनेने केंद्र सरकार विरोधात याचा निषेध म्हणून आज कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याणच्या शिवाजी चौकात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले.यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी शिवाजी चौकात चुली मांडून या चुलीवर भाकरी थापत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

इंधन दरवाडी विरोधात शिवसेनेकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले जात आहे. आज कल्याण पश्चिमेत शिवसेनेने केंद्र सरकारच्या विरोधात केलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते यावेळी सर्वसामान्यांची इंधन दरवाढ करून लूट करणाऱ्या सरकार विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.
close