shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भरणेवाडीत अनुपस्थित सरपंचाची दाखविली खोटी हजेरी- भाजप तालुकाध्यक्षांची टीका..!!

भरणेवाडीत अनुपस्थित सरपंचाची दाखविली खोटी हजेरी- भाजप तालुकाध्यक्षांची टीका..!!
 
   - संख्या दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न 
    
     
इंदापूर:प्रतिनिधी (दि.१५ फेब्रु.२०२१)
          भरणेवाडी येथे आज रविवारी (दि.14) ग्रामपंचायतीवर जास्त सरपंचांची संख्या दाखविण्याचा सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला प्रयत्न केविलवाणा असा आहे. या कार्यक्रमासाठी अकोले, पिठेवाडी,भांडगाव ग्रा.पं. चे सरपंच उपस्थित नसताना ते हजर दाखविण्याचा मंत्रीपदावरील व्यक्तीने केलेला खोटा प्रयत्न हास्यास्पद आहे. भाजपच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थित असलेले अनेक  ग्रामपंचायतींचे सरपंच हे सत्तेचा दबाव टाकून कार्यक्रमाला बोलावून घेतले होते. त्यामुळे खोटी संख्या दाखवण्याचा प्रयत्न करून जनमत बदलत नाही, अशी टीका इंदापूर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी केली आहे.
               ते म्हणाले, मंत्रीपद असूनही जास्त ग्रामपंचायती दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याची वेळ का येते, याचे आत्मपरीक्षण सत्ताधाऱ्यांनी करण्याची गरज आहे. भाजपच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित असलेले कचरवाडी (निमगाव), सरडेवाडी, दगडवाडी आदी ग्रामपंचायतींचे सरपंच तेथेही सत्तेच्या दबावापोटी उपस्थित होते. तसेच चांडगाव, कळंब, जाधववाडी, पिंपळे येथे भाजपच्या  सदस्यांचे बहुमत असल्याने त्या ग्रा.पं. वरती भाजपचे वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतींवरही वर्चस्व दाखवण्याचा राष्ट्रवादीने केलेला प्रयत्न केविलवाणा असल्याचे भाजपच्या तालुकाध्यक्षांनी सांगितले.
            इंदापूर तालुक्यात भाजपचा  37 ग्रामपंचायतींवरील वर्चस्वाचा दावा कायम आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली  इंदापूर तालुक्यामध्ये भाजपचा जनाधार वाढला आहे, असेही यावेळी तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी स्पष्ट केले.
close