shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टाकळी काझी आरोग्य उपकेंद्र दुसऱ्यादा‌ चर्चेत....!!

टाकळी काझी आरोग्य उपकेंद्र दुसऱ्यादा‌ चर्चेत..!
नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):

गेल्या अनेक  महिन्यांपासून ‌कोरोना कार्यकाळात आपण पोलिस व आरोग्य विभागाचे काम हे अभिमानास्पद पाहतो होतो.अनेक ना कोरोना योध्दा पुरस्कार सोहळे पाहिले फोटो सेशन झाले.

पण काल परवा या वर एक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी अपवाद ठरले  नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील नगर तालुका पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रामध्ये शनिवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये सुमारे ५१ महिलांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या.

गोरगरीब जनतेसाठी शासनाने मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी एकीकडे कंबर कसली असताना दुसरीकडे मात्र टाकळी काझी येथील आरोग्य उपकेंद्र अधिकारी यांनी गर्भपिशवी साफ  करण्याच्या नावाखाली रुग्णांकडून नातेवाईक कडुन दि.५ रोजी व दि.६ रोजी  एक हजार ते दोन हजार रुपये मागणी केली व ते वसुल हि केले असल्याचा तक्रारदाराचा व्हिडिओ  देवाण घेवाणीचा व्यव्हार ची माहिती समोर आली आहे.

टाकळी काझी आरोग्य उपकेंद्र वर नेहमीच मनमानी कारभार सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळते. मागील‌ नोव्हेंबर  महिन्याच्या काळात येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता आरोग्य उपकेंद्राला  कुलुप लावुन आप आपल्या ‌घरी गेल्याचे स्पष्ट झाले होते.या  मनमानी कारभाराचे ज्वलंत उदाहरण दिले होते ,  गोरगरीब जनतेला न्याय कधी मिळणार का या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्न उद्भवत आहे.मागील काही महिन्यांपूर्वी   जन आधार संघटनेचे अध्यक्ष  प्रकाश पोटे यांच्याकडे काही नागरिकांनी तक्रार केली असता त्यांनी घटनास्थळी जात आंदोलन पुकारले होते .मात्र लोकप्रतिनिधींकडून यापुढे अशी चूक झाल्यास येणाऱ्या काळामध्ये कार्यवाही केली जाईल असे संकेत देण्यात आले होते.

लोकप्रतिनिधी यां ठिकाणच्या आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना समज दिल्यानंतरही येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यास केराची टोपली दाखवत शनिवारी घडलेल्या प्रकारा बाबत लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.नगर तालुक्यातील लोकप्रतिनिधी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर तालुका पंचायत समिती सभापती कोकाटे  यांच्या गणात हा प्रकार घडल्याने सभापती कोकाटे  यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्याचबरोबर या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिय शिबिरामध्ये प्रारंगणात कुठलीही सोशल डिस्टंसिंग चे नियम व  मास्क याचा वापर रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून करून घेतल्याचे कोठेही आढळून आले नाही. टाकळी काझी येथील आरोग्य उपकेंद्रात चालवलेल्या अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला चाप बसणार की यापुढेही असाच मनमानी कारभार सुरू राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत  सखोल माहिती घेऊन व चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. डॉ अनिल ससाने, नगर प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी..


सध्या तालुका आरोग्य अधिकारी रज्जेवर आहे. प्रभारी तालुका आरोग्य डॉक्टरांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत.चौकशी करुन यातील दोषी संबंधित डॉक्टर ‌कर्मचारी यांच्या वर कार्यवाही करणार आहोत यापूर्वी रुईछत्तीसी येथे अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ते पुर्ण  पणे मोफत करण्यात आले आहेत,पैसे घेण्याचा प्रकार घडला असेल तर तो निंदनीय आहे.

 उप सभापती रवींद्र भापकर, नगर तालुका पंचायत समिती..!
close