shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पदाचा गैरवापर करणाऱ्या पोलीस पाटलावर कारवाईची मागणी..!!

मुलाचा विवाह अल्पवयीन मुलीशी करून देत, पदाचा गैरवापर करणाऱ्या पोलीस पाटलावर कारवाईची मागणी.. 


दिनांक २ फेब्रुवारी (पेडगाव,दौंड/श्रीगोंदा): दौंड तालुक्यातील पेडगावचे पोलीस पाटील मदन बयाजी गोरे यांच्यावर कारवाईची मागणी केलेले पत्र प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहे. पोलीस पाटील मदन गोरे यांनी त्यांच्या मुलाचा विवाह काष्टी, तालुका श्रीगोंदा येथील अल्पवयीन मुलीशी करून दिला असल्याची तक्रार फोनद्वारे चाइल्ड लाईन कडे करण्यात आली होती.



सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार भीमराव बाळू गोरे यांनी याबाबत अहमदनगर चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक यांना विवाह दिनी (दिनांक २६/०२/२०२०) रोजी फोनद्वारे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने काष्टी येथे होत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या विवाहमध्ये चाईल्ड लाईनचे पदाधिकारी येऊन त्यांनी हा विवाह थांबवला होता. मात्र, ते अधिकारी परत गेल्यावर संध्याकाळी आर्वी या मुलीच्या मामा व काकाच्या गावामध्ये हा विवाह संपन्न होऊन दोन दिवसांनी धार्मिक पूजा झाली होती. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई चालू असल्याचे चाईल्ड लाईन मार्फत कळवण्यात आले. अशी माहिती भीमराव गोरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

भीमराव गोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात पुढे नमूद केले आहे की, पोलीस पाटील मदन गोरे यांनी पदाचा गैरवापर करून पोलीस प्रशासनाचे नाव कमी करण्याचा प्रकार करीत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अवैध वाळू तस्करी, अनधिकृत दारू व्यवसायकांना सहकार्य केले जात असून, स्थानिक ग्रामस्थांमध्ये या व्यक्तीबद्दल दहशतीचे वातावरण आहे. गावगुंड पद्धतीने वागणाऱ्या या व्यक्तीपासून गावातील साधारण लोकांनाही मोठी दहशत वाटते. असे त्यांचे मत आहे.

म्हणून पदाचा गैरवापर करणाऱ्या पोलीस पाटील मदन बयाजी गोरे (मौजे पेडगाव, तालुका दौंड) या इसमावर मुलाचा विवाह अल्पवयीन मुलीशी लावून दिल्याबद्दल, तसेच कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृत धंद्यांना पाठबळ देणे, अवैध व्यावसायिकांना सहकार्य करणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे यामुळे सार्वत्रिक हितासाठी भीमराव गोरे यांनी पुढाकार घेऊन, नमूद इसमाच्या त्रासापासून सामान्यांची सुटका व्हावी. तसेच, नमूद अल्पवयीन मुलीचे प्रकरण पुढे येऊन, पदाचा गैरवापर करणाऱ्या या पोलीस पाटलावर कायदेशीर कारवाई व्हावी. म्हणून, श्रीगोंदा, दौंड कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, चाईल्ड लाईन इत्यादींना तक्रार अर्ज तर, पत्रकारांना प्रसिद्धीसाठी माहिती दिली आहे.


स्रोत:(भीमराव बाळू गोरे यांनी दिलेले प्रसिद्धी पत्र)

close