shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम.. माझी वसुंधराच्या माध्यमातून झाडे लावून अभिष्टचिंतन..!!

इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम.. माझी वसुंधराच्या माध्यमातून झाडे लावून अभिष्टचिंतन..!!
इंदापूर प्रतिनिधी तात्याराम पवार: (दि.२ फेब्रु.२१) इंदापूर नगर परिषदेच्या वतीने माजी वसुंधरा या अभियानाअंतर्गत इंदापूर शहरांमध्ये नगराध्यक्षा अंकिता  शहा यांच्या योग्य त्या नियोजनाखाली अनेक ठिकाणी पर्यावरण पूरक असे वेगवेगळे उपक्रम राबवून इंदापूर शहराचे दर्शन अतिशय सुंदर कशा पद्धतीने  होईल यासंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने कामे चालू असल्याचे निदर्शनास येत असून इंदापूर शहरातील रंग रंगोटी, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, सायकल चालवण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था, इंदापूरच्या वैभवातील मोलाची भर आहे.
आज (दि.२)माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याचे अभिष्टचिंतनानिमित्त इंदापूर शहरातील बायोडायव्हर्सिटी पार्क येथे झाडे लावून साजरा करण्यात आला.
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा इंदापूर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर ,आस्थापन विभागाचे गजानन पुंडे, आरोग्य निरीक्षक अधिकारी गोरक्षनाथ वायाळ व इतर कर्मचारी उपस्थित होते.
इंदापूर नगर परिषदेच्या बायोडायव्हर्सिटी पार्क येथे नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक व  स्वच्छ सर्वेक्षण नोडल अधिकारी गोरक्षनाथ वायाळ यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अंतर्गत बायोडायव्हर्सिटी पार्क उभा केला आहे तेथे इंदापूर नगरपरिषदेचे प्रत्येक कर्मचारी यांच्या अभिष्टचिंतना दिवसी आयुर्वेदिक झाडे लावून त्यांचे  मशागत सर्व कामे करतात. आज नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी यांच्यासमवेत गोरक्षनाथ वायाळ यांनी अर्जुनाची झाडे लावली आहेत. आयुर्वेदामध्ये अर्जुनाचे झाडाचे  फार महत्त्व आहे .सर्व कर्मचारी आपल्या अभिष्टचिंतना दिवसी अशी झाडे बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये लावून त्याचे जतन करणार आहेत.

आरोग्य निरीक्षक गोरक्षनाथ वायाळ यांनी घेतली वृक्ष जतनाची हमी.
गोरक्षनाथ वायाळ यांनी त्यांच्या अभिष्टचिंतन या दिवशी नगर परिषदेच्या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये अर्जुन व तुळस या झाडांची लागवड केली असून त्या झाडांची जोपर्यंत इंदापूर नगरपरिषदेमध्ये कार्यरत आहे. तोपर्यंत त्या झाडाचे जतन करणार असल्याची हमी घेतो असे स्पष्ट केले.
close