shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एकता साहित्य संमेलनात दीपक महाले यांचे व्यंगचित्र प्रदर्शन ..!


शिरूर कासार: मानूर ता.शिरूर कासार येथे नुकतेच दोन दिवसीय एकता साहित्य संमेलन संपन्न झाले.व्यंगचित्रकार दीपक महाले यांच्या सामाजिक विषयांवरील व्यंगचित्रांचे प्रदर्शन संमेलनात आयोजित करण्यात आले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन फीत कापून  करण्यात आले. 

याप्रसंगी महंत विवेकानंद शास्त्री महाराज, संमेलनाचे उद्घाटक राजकुमार तांगडे ,साहित्यिक एकनाथ आव्हाड, किरण भावसार, तुकाराम धांडे ,शिरूर पंचायत समितीच्या सभापती उषाताई सरवदे ,गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण, पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने, गटशिक्षणाधिकारी जमीर शेख , यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हेल्मेटचा वापर, शेती ,पूर, कोरोना, मार्केटिंग, शाळा, पर्यावरण, वृक्षतोड ,जंगल , फेसबुक, शौचालय,व्हाट्स ॲप इ. विषयांवरील व्यंगचित्रांना रसिकांनी दाद दिली.
एकता फाउंडेशनचे अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड,उपाध्यक्ष माही शेख, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर ,सचिव पत्रकार गोकुळ पवार, शिवव्याख्याते कैलास तुपे, लखुळ मुळे, नितीन कैतके शहादेव मुळे यांनी व्यंगचित्र प्रदर्शनास भेट दिली. 

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रभाकर साळेगावकर यांनी व्यंगचित्रांतून दिलेल्या संदेशांचे स्वागत केले.
close