shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्या समवेत सायकल चालवण्याचा घेतला आनंद..!!

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  विद्यार्थ्या समवेत सायकल चालवण्याचा घेतला आनंद..!!
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे सायकल वाटपास गेले आणि सायकल चालवण्यात विद्यार्थ्या समवेत मग्न झाले.



इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील मौजे रणगाव येथील आदर्श एज्युकेशन सोसायटीचे रणगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना इंद्रायणी बालन फाउंडेशनच्या वतीने व सकाळ सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते सायकल वाटप करण्यात आले यावेळी रणगाव परिसरातील ग्रामस्थ मान्यवर आणि विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्या समवेत सायकल चालवण्याचा आनंद घेत विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण मारले. त्यांनी विद्यार्थ्या समवेत सायकल चालवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. लहान थोरा मध्ये मिळून मिसळून राहणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आज जनतेसमोर वेगळ्या रूपाने म्हणजेच सायकल स्वराच्या रूपाने सर्वांनी पाहिल्यामुळे उपस्थित नागरिकातून विशेष कौतुक होत असल्याचे दिसून आले .
close