शिवजयंतीनिमित्त स्वप्नील सावंत यांच्या संकल्पनेतून सर्वपक्षीय नेत्यांसमवेत वृक्षारोपण..!!
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहरात नगरपालिकेच्या ऑक्सिजन पार्कमध्ये इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली, यावेळी इंदापुर शहराच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते वृक्ष लागवड करत वसुंधरा जपण्याची या वेळी शपथ घेण्यात आली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी वृक्षलागवड करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवत वृक्ष संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, तसेच शहरातील ज्या नागरिकांना वृक्ष आपल्या दारात घरासमोर लावण्यासाठी हवे असतील त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी स्वप्नील सावंत यांनी केले.
स्वप्नील सावंत यांच्या संकल्पनेतून वृक्षलागवड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली यामध्ये इंदापूर शहराच्या नगराध्यक्षा अंकिता शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे,सभापती अनिकेत वाघ, स्वप्नील राऊत, पोपट पवार, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शकील सय्यद,गुड्डू मोमीन, डॉ लक्ष्मण आझबे,पोलीस अधिकारी इमतियाज मुलांनी, माजिद पठाण, इंदापूर शिवसेना शहरप्रमुख महादेव सोमवंशी आदी मान्यवरांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावत वृक्षलागवड केली.
या कार्यक्रमाचे नियोजन इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर,सचिव महादेव लोंढे, भगवानराव पासगे, जिल्हा सरचिटणीस जाकीर काजी,शहराध्यक्ष रमजान बागवान, निवास शेळके, शहर युवक काँग्रेसचे सचिव सुफीयान जमादार यांनी केले..
यावेळी वृक्षारोपण करण्यासाठी पुणे जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष सोमनाथ दौंडकर उपस्थित होते, यावेळी त्यांनी लावलेली वृक्ष लागवड व संगोपन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करावे असे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
जय जिजाऊ जय शिवराय,,,झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत कार्यक्रम संपन्न झाला

