shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हनुमान व्यायाम शाळा व जिम अँड फिटनेस क्लब वडापुरी च्यावतीने शिवजयंती साजरी..!!

हनुमान व्यायाम शाळा व जिम अँड फिटनेस क्लब वडापुरी च्यावतीने शिवजयंती साजरी..!!
इंदापूर प्रतिनिधी:वडापुरी येथे हनुमान व्यायामशाळा व जिम अँड फिटनेस क्लब वडापुरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून नारळ फोडून पूजन करण्यात आले. व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या घोषणा देत शिवजयंती (दि.१९)साजरी करण्यात आली.
 तसेच गावातील शिवाजी चौक या ठिकाणी  नाम फलकास पुष्पहार घालून  नारळ फोडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्यायाम शाळेचे वस्ताद किरण गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी जय हनुमान व्यायाम शाळा फिटनेस क्लब या ठिकाणी  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. 
 शिवाजी महाराज यांचे शौर्यगाथा त्यांचा आचार-विचार राष्ट्रप्रेम यांचा आदर्श घेऊन आजच्या काळातील संस्कारक्षम बलवान युवक कसे बनावे या बाबत वस्ताद किरण गोसावी यांनी युवकांना मार्गदर्शन केले .
ते पुढे म्हणाले की, वडापूरी येथील हनुमान व्यायाम शाळा म्हणजे सदृढ ,बलवान आणि महापुरुषांचे संस्कार घडवणारे आदर्श व्यायाम शाळा आहे. याठिकाणी व्यायामाबरोबर सर्व महापुरुषांचे व ज्येष्ठांचे  संस्कारही घडवले जात आहे.असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

यावेळी रंजीत मोटे, प्रज्वल गोसावी, ओमकार पाटील, नीलेश शेलार ,संकेत गोसावी, राहुल धोत्रे ,कल्याण साळे, पांडुरंग जाधव ,आशिष वाळेकर, प्रतीक गोसावी ,ओम गोसावी ,फर्दिन मुलानी ,अजिंक्य बोराटे, राहुल कदम, अमोल शेंडे, महादेव कदम ,अनिश शेख, संदीप जाधव, अमन शेख, अक्षय लोकरे, देवा काळुंके, रंजीत राऊत ,पंकेश खरात, तुषार गोसावी ,प्रणव काळे, संदीप मगर, बाळू जाधव, शुभम काकडे, शुभम कदम, रोहन पवार, बबलू पवार इत्यादी उपस्थित होते.
close