हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) दि.१२,हिंगोली तालुक्यातील मौजे इडोळी ते साटंबा जाणा-या रोडवर विना परवाना अवैध वाळु वाहतुक करतांना हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कार्यवाही करीत ०४ ट्रॅक्टर, वाळुसह २३ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन ७ जणावर हिंगोली ग्रामिण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.यामुळे जिल्हयातील अवैध वाळु तस्करामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वाळुच्या चोरटी विक्रीचे प्रमाण पाहाता पोलीस अधिक्षक राकेश कलासागर साहेब,हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदयजी खंडेराय यांच्या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळु तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी एका पथकाची स्थापना केली असुन याच पथकाला गुप्त माहिती मिळाली की,हिंगोली तालुक्यातील मौजे इडोळी ते साटंबा जाणा-या रोडवर अवैध वाळुची ट्रक्टर व्दारे वाहतुक होत आहे.आज दि.१२ फेब्रुवारी शुक्रवार रोजी स्था.गु.शाखेच्या पथकाने सापळा रचुन कार्यवाही केली.यावेळी ०४ ब्राँस वाळु किंमत २० हजार रुपये व ०४ ट्रॅक्टर, ०४ ट्राँली किंमत २२ लाख ८० हजार रुपये असा एकुण सुमारे २३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी ट्रक्टर चालक १)उत्तम महादा चक्के.२)वैजनाथ प्रकाश डोल्हारे,३)कैलास परसराम करडीले,४)मंगेश शिवाजी डोल्हारे तर ट्रक्टर मालक ५)नारायण बाबुराव डोल्हारे,६)बंडु निवृत्ती कन्हेरकर,७)शिवाजी विठ्ठल डोल्हारे सर्व राहाणार इंचा ता.जि.हिंगोली यांच्या विरुध्द विना परवाना अवैध वाळू, गौण खनिजाची चोरटी वाहतुक केल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर साहेब,हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदयजी खंडेराय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे,उपनिरीक्षक किशोर पोटे,संभाजी लेकुळे,भगवान आडे,राजु ठाकुर,दिपक पाटील,आकाश टापरे,चालक पो.ना.शेख जावेद यांच्या पथकाने केली आहे.


