shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोंधवणीरोड पाटाच्या पुलाखाली प्रचंड प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य..!!



शहरात रोगराई पसरण्याची शक्यता ? 

झोपी गेलेल्या नगर पालिका प्रशासनास जाग आणण्यासाठी जे.जे.फाऊंडेशन घंटानाद आंदोलन करणार !

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- 
सध्या श्रीरामपूर शहरात सर्वत्रच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नगर पालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे,
गोंधवणीरोड हा परिसर अत्यंत गजबजलेला परीसर असून मोठी लोकवस्ती याठिकाणी आहे,

मात्र गोंधवणीरोड पाटाच्या पूलाखाली नेहमीच काही कोंबडी  (चिकन) मटण विक्रेते कोंबड्यांची पंख आणि इतर घाण याठिकाणी मुद्दामहून आणुन टाकतात यामुळे याठिकाणी मोकाट कुत्र्यांचा मोठा वावर अधिक प्रमाणात असतो, रस्त्याने ये - जा करणार्या नागरीकांना,शालेय विद्यार्थी तथा लहान बालकांच्या अंगावर येथील मोकाट कुत्रे धाऊन जात कधी चावाही घेत आहेत, तसेच शहरातील काही नागरीक आपली मेलेली जनावरे शेळी,मेंढी,कुत्रे याठिकाणीच आणून टाकतात मात्र या पुलाखाली पुर्वीच साचलेले घाण पाणी असल्याने त्यात सदरील मेलेली जनावरे अक्षरश:सडून परिसरात प्रचंड प्रमाणात नेहमीच दुर्गंधी पसरते यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा भयानक प्रश्न निर्माण होतो आहे,


हे सर्व अवगत असताना देखील संबधीत नगर पालिका प्रशासन स्वच्छता विभाग (ठेकेदार) "असूनी डोळे, पण अंधाळे"अशी सातत्यानेच भुमिका बजावत असल्याने नागरीकांना नाविलाजास्तव मोठ्या प्रमाणात या दुर्गंधीच्या त्रासाचा सामना करणे भाग पडत आहे,शहरातील अस्वच्छतेबाबत जे.जे. फाऊंडेशनने नगर पालिका प्रशासनास अनेकवेळा कळवूनही आणि उपोषणे करुनही केवळ खोटी आश्वासनेवितिरिक्त काहीच उपयोग होत नाही आणि कोणीच दखल घेत नाही अशी भयानक आवस्थेतून या परीसरातील नागरीकांना नेहमीच या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे,चक्क उघड्यावर पडलेली मेलेली जनावरे नगर पालिकेच्या स्वच्छता विभागास (ठेकेदार) कर्मचार्यांना न दिसावी यापेक्षा शहरवासियांचं दुर्दैव ते काय? असे म्हटल्यास वावगे ठरुच शकत नाही,कारण या स्वच्छता (ठेकेदार) कर्मचार्यांवर नगर पालिका प्रशासनाचे जरासे देखील वचक असावे असे काहीच दिसून येईनासे झाले आहे,मात्र आता याविरुद्ध जे.जे.फाऊंडेशन झोपी गेलेल्या नगर पालिका प्रशासनास जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार असल्याचे जे.जे. फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,

आता तरी श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि नागरीकांना त्रासापासून मुक्त करावे अन्यथा शहरातील नागरीकांना स्वच्छता ठेकेदाराच्या भरवशावर सोडणार्या आणि नागरीकांच्या आरोग्याशी खेळू पाहणार्या  नगर पालिका प्रशासन तथा विदमान नगर पालिका लोकप्रतिनिधींना येत्या नगर पालिकेच्या निवडणूकीत याची मोठी किंमत चुकती करावी लागेल असेही शेवटी या पत्रकात म्हटले आहे, या पत्रकावर जे जे फौंडेशन चे जोएफ जमादार,असिफ तंबोली, गुड्ड जमादार, अल्तमश शेख, अरबाज कुरैशी, जकरिया सैय्यद, मुबसशीर पठान,अनवर तंबोली, दानिश पठान, शादाब पठान,नईम बागवान, शाहिद शेख, फरहान शेख आदींच्या स्वक्षर्या आहेत

close