shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिठेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ कमल बुरुंगले व उपसरपंच पदी वैभव व्हनकडे यांची निवड

पिठेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ कमल बुरुंगले व उपसरपंच पदी वैभव व्हनकडे यांची निवड
पिठेवाडी गावच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध राहणार असल्याचे सौ बुरुंगले यांनी आपले मत व्यक्त केले .
इंदापूर :  ( प्रतिनिधी )

पिठेवाडी ग्रामपंचायतीच्या आज (दि.०९) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय जाणकारांचे अंदाज चुकवत  सौ कमल बापू बुरुंगले व उपसरपंचपदी वैभव अनंता व्हनकडे  यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी .पी. कोकणे यांनी जाहीर केले.
पिठेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत चुरशीने लढवली गेली. यामध्ये  जय हनुमान ग्रामविकास पॅनलने  सात पैकी सहा जागांवर विजय मिळवत, पिठेवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व स्थापन केले. (दि ०९) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील   सौ कमल बापू बुरुंगले , वैभव अनंता व्हनकडे यांच्या निवडीमुळे पिठेवाडी ग्रामस्थ समाधान व्यक्त करताना दिसत होते.


यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र लाला मासाळ, पप्पू साधू जानकर, सौ.सीताबाई बबन वाघमोडे ,सौ सिंधू नाना शेंडगे व पॅनल मधील सर्व मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.पी. कोकणे,  ग्रामसेवक एस. सव्वाशे यांनी काम पाहिले.
close