उपलब्ध माहितीनुसार, शिंदे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास जखमी अवस्थेत रुबी हाॅस्पिटलला दाखल केले गेले. पण उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.लोणीकंदमध्ये ही घटना घडल्या नंतर तणावाचे वातावरण आहे. लोणीकंद पोलीस निरिक्षक प्रताप मानकर पुढील तपास करीत आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. शिंदे हा लोणीकंद परिसरात गोल्डमॅन म्हणूनही ओळखला जात होता.
पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण धक्कादायक रित्या वाढलेले असून जमिनींना आलेला लाख मोलाचा भाव आणि कमी कष्टात मिळणारा अमाप पैसे हे यामागचे मोठे कारण आहे . बहुतांश स्थानिक तरुण पिढी यात अडकत चाललेली असून पुण्यातील इतर स्थानिक उद्योगांवर परप्रांतीयांचा कब्जा होत चाललेला आहे तर स्थानिक मराठी मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. फायरिंगचे वृत्त समजताच लोणीकंद पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली. अतिरिक्त एस. पी. विवेक पाटील, विभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सुचना दिल्या.

