प्रशासकीय यंत्रणा झाली सज्ज ; विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू..!!
केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :-
गेल्या वर्षभरापासून देशासह संपुर्ण जगात कोरोनाने हाहाकार उडवला होता. आठ महिन्याच्या प्रदिर्घ कालांतराने परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली असून केज तालुक्यातही नव्याने रूग्न मिळत असल्याने जनतेने आता सावधान होणे गरजेचे आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की कोरोनाचे संकट पुन्हा केज तालुक्यावर घोंगावत असुन कोरोनाच्या रूग्नामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
म्हणून प्रशासकीय यंत्रणाही आता पुर्णपणे सज्ज झाली असून केजचे तहसिलदार यांनी स्वतः आपल्या गाडीतील ध्वनीक्षेपकाद्वारे जनतेला सावध होण्यासाठी संदेश दिला आहे. तर शासनाच्या आदेशानुसार विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जनताही आता पहिल्या सोसलेल्या झळा पुन्हा आठवु लागली असुन. सर्वजण परत लॉकडाऊन तर होणार नाही ना या भितीने सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अनेकजण या महामारीला मज्जाक म्हणून घेत आहेत. परंतु असे न करता सर्वांनी आता वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
प्रशासकीय स्तरावरून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन तंतोतंत करावे.व तोंडाला मास्क लावणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे , सँनिटाईझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सामाजिक अंतर ठेवणे.या पहिल्याच नियमांचे पालन पुन्हा करणे गरजेचे आहे.
या करिता केजचे तहसीलदार श्री.मेंडके साहेब यांच्या आदेशानुसार नायब तहसिलदार श्री.सचिन देशपांडे यांनी शनिवार पासून स्वतः सर्व केज शहरातून फिरून ध्वनिक्षेपकाद्वारे जनतेला सावध होण्याचे संकेत दिले असून शहरासह सर्व ग्रामीण भागातही मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. व या नियमांचे ऊल्लंघण करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करतांना पहावयास मिळत आहे.
गेल्या वर्षांपासून आपण सर्वांनी कोरोना या महामारीचा सामना केला.असुन आता हे संकट पुन्हा येवू पहात असल्याने सर्वांनी सावध होणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने वेळोवेळी घालुन दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे.
श्री . दुलाजी मेंडके साहेब. तहसीलदार , केज.

