shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज पोलीसांची अवैद्य दारू विरुद्ध कार्यवाही..!!



हॉटेल गारवावर पकडली अवैद्य देशी दारू
----------   

केज ।‌ जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :-  
केज पोलीसांनी अवैद्य दारूवर धडक कार्यवाही करून एका हॉटेलमध्ये बेकायदेशीर विक्री करीत असलेल्या देशी दारुवर छापा टाकला आहे.


या बाबतची प्राप्त माहिती अशी की, दि.२१ फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी ४:३० वा च्या सुमारास केज तालुक्यातील चिंचोली माळी ते नांदूर फाटा रोड लगतच्या हॉटेल गारवाच्या पाठीमागे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशाने पोलीस नाईक अमोल गायकवाड, अशोक नामदास आणि अशोक गवळी यांनी छापा घातला. 

या वेळी रोहित तानाजी देशमुख हा बेकायदेशीररित्या विनापरवाना दारू विक्री करीत असताना आढळून आला. हॉटेल गारवाच्या पाठीमागे त्याने टँगो पंच कंपनीच्या १८० मि.ली. च्या ४८ बाटल्या एकुण किंमत २४९६ रु चा माल बाळगून त्याची विक्री करीत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी मुद्देमाल हस्तगत करून पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादी वरून रोहित देशमुख यांच्या विरुद्ध केज पोलीस स्टेशनला मुंबई दारूबंदी कायदा ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

त्याचा पुढील तपास पोलीस नाईक अमोल गायकवाड हे करीत आहेत. या कार्यवाहीमुळे अवैद्य धंदे आणि अवैद्य दारू विक्री करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहे.
close