shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोराटवाडी चौफुला येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्री समर्थ मेडिकल या दुकानाचे उद्घाटन संपन्न..!!

बोराटवाडी चौफुला येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्री समर्थ मेडिकल या दुकानाचे उद्घाटन संपन्न..!!
इंदापूर प्रतिनिधी: बोराटवाडी चौफुला येथे श्री समर्थ मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दुकानाचे उद्घाटन भाजप नेते व माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते(दि.२२ फेब्रु.) उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर एम के इनामदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे होते ;
तर या कार्यक्रमा प्रसंगी  नीरा-भीमा कारखान्याचे संचालक तथा सरपंच दत्तात्रेय सव्वाशे, पै. नितीन माने , भाजपा इंदापूर सोशल मीडिया प्रमुख साहेबराव पिसाळ, शिवाजी तुपे ,विठ्ठल तुपे ,तुकाराम तुपे, प्रकाश खुसपे,दयानंद गायकवाड, आजिनाथ पाटील ,डॉ. अशोक सुद्रिक, डॉ. धनाजी इंगोले, डॉ. राजेंद्र देवकर ,डॉ.अतुल शेळके, डॉ.रंजीत मोठे , डॉ.विठ्ठल वाघमोडे , डॉ.राजेंद्र वाघमोडे राजेंद्र भाळे. इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, युवकांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसायाला प्राधान्य दिले पाहिजे. महिलांनी सुद्धा पुरुष यांच्याबरोबर सहभाग घेतला तर कुटुंबाची प्रगती होण्यासाठी विशेष मदत होते.आणि तो आदर्श या पवार कुटुंबीयांनी या व्यवसायातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  श्री समर्थ मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दुकानाचे उद्घाटन संपन्न झाल्याचे जाहीर करून त्यांना या व्यवसायाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
close