हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०६,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील सामाजिक कार्यकर्ते पंडित दौलतराव तिडके यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी निवड.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष पदी कार्यरत असलेले पंडित तिडके यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी राष्ट्रीय समितीच्या वतीने निवड करण्यात आली.राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप(बाबा) पाटील खंडापूरकर यांनी नांदेड येथे पंडित तिडके यांना दि.०५ फेब्रुवारी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला याप्रसंगी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत सिंग कॉलरा,प्रदेश सरचिटणीस ब्रिक्स मानव अधिकार मिशन डॉ.मीनिशा तिवारी उपस्थित होते या निवडीबद्दल महाराष्ट्रातील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वरिष्ठ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रायजादा,राष्ट्रीय कोषाध्यक्ष शरद सिंग ठाकूर,प्रदेश कार्याध्यक्ष श्रावण कुळे,प्रदेश सरचिटणीस राजू पाटील सीपाळकर, प्रदेश उपाध्यक्ष राम गीरे पाटील,प्रदेश अध्यक्ष राणीताई स्वामी, प्रदेश युवती ब्रिक्स मानव,हुमन राईट युवती पूजाताई निचळे,बापूराव ढगे पाटील,विजयाताई काचावार, पोलसेटवार ताई,नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरजी मावलगे,प्राध्यापक बालाजी गायकवाड,विनोद भारती, हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजीराव वानखेडे,हिंगोली जिल्हा अध्यक्ष महिला ज्योतीताई धुळे,शंकरराव देशमुख,विठ्ठल धाकतोडे,गजानन टेकाळे,आशा घोडके,वंदना थिटे,संतोष बिडकर व तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या निवडीबद्दल पंडित तिडके यांचे अभिनंदन केले.

