shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळवंडी गावचे माजी उपसरपंच सोनभाऊ नाना दांगट यांचे अपघातात निधन..!

आळेफाटा  : 
पिंपळवंडी गावचे माजी उपसरपंच सोनभाऊ नाना दांगट यांचे गुुंजाळवाडी या ठिकाणी झालेल्या अपघातात  दि.4 जानेवारी 2021 निधन झाले.
        सोनभाऊ नाना दागंट (वय५२)

याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार सोनभाऊ नाना दांगट(वय५२) हे पिंपळवंडी (ता.जुन्नर)या ठिकाणी राहत असुन त्यांचे बेल्हा या ठिकाणी दुकान असुन ते बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून आपल्या कार ने घरी जात असताना गुंजाळवाडी या ठिकाणी त्यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या डिवायडरला त्यांची  कार जोरात धडकली व यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

सोनभाऊ नाना दांगट हे जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध गाडामालक आणि मुंबई स्थित  उद्योजक किशोरशेठ दांगट यांचे ते बंधू होत .पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मधुकर पवार हे करत आहेत.
close