shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलीसानी मारलेल्या छाप्यात १ लाख ७० हजारांची ५६ किलोची आफुची झाडे जप्त करून आरोपीस अटक..!!

खर्डा: प्रतिनिधी : 
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील काळे वस्तीवर वासुदेव महादेव काळे यांनी अफूची झाडे लावल्याचे गुप्त माहिती जामखेड पोलीसांना मिळाल्याने पोलीसानी  मारलेल्या छाप्यात १ लाख ७० हजारांची ५६  किलोची आफुची झाडे जप्त करून आरोपीस अटक करण्यात आले. 

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त खबरीकडून माहीती मिळाली त्यानंतर पोलीस पथकासह त्या ठिकाणी जाऊन खात्री करुन घेतली  असता आरोपी वासुदेव महादेव काळे रा. काळे वस्ती, जातेगाव याने त्याच्या मालकीच्या गट नंबर १०७७ मधिल शेतात ५६ किलो वजनाची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली १ लाख ६९  हजार ८१५ रुपये किमतीची अफुची झाडे लावल्याचे आढळून आले.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड  यांच्यासह  पो. हे कॉ संजय लाटे, संदिप आजबे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ, संदिप राऊत, अविनाश ढेरे यांनी गुरुवारी( दि.२५) रोजी सायंकाळी छापा टाकून सर्व झाडे जप्त करण्यात आले .

यावरून जामखेड पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी वासुदेव महादेव काळे च्या विरोधात अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी (उत्तेजक) पदार्थ अधिनियम सन १९८५ च्या कलम १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व आरोपीस अटक केली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिक्षक मनोज पाटील ,अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल ,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.
close