शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..!!
बोराटवाडी येथील सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
हजारोंच्या संख्येने जनसमुदाय अंत्यदर्शनासाठी बोराटवाडीत उपस्थित.
देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमले
इंदापूर प्रतिनिधी:आसाम मध्ये शहीद झालेले इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्या पार्थिवावर (२५ फेब्रु.२१)शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रसंगी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले. यानंतर हजारोंच्या उपस्थितीत त्यांची गावातून अंत्ययात्रा निघाली .यावेळी देशभक्तिपर घोषणांनी वातावरण दुमदुमले अत्यंत शोकाकुल वातावरणात सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्या पार्थिवाला अग्नि दिला.
शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांचे पार्थिवावर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
या वेळी राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील ,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे , लाखेवाडी पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे,माजी सभापती विलासराव वाघमोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, बोराटवाडी गावचे सरपंच दत्तात्रय सव्वाशे, इंदापूर नायब तहसीलदार अनिल ठोबंरे. इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव त्यांचे सहकारी पोलीस पथक, माजी सैनिक .इंदापूर तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी इत्यादी सह अनेक मान्यवर तसेच इंदापूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देण्यात आले.
बोराटवाडी गाव व पंचक्रोशीतील लहान थोर मंडळी शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्या नावाची घोषणा देत देत गहिवरून आले होते.

