shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजीक न्याय आयोगाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी शिरीष तोष्णीवाल यांची नियुक्ती..!!

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) दि.२६,संयुक्त राष्ट्रामधे स्थापीत व संलग्न असलेल्या तथा भारत सरकारच्या नीती आयोगाशी जोडून असलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजीक न्याय आयोगाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सेनगाव येथील शिरीषकुमार तोष्णीवाल यांची नियुक्ती करण्यात आली.         




आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजीक न्याय आयोग हे मानव अधिकाराच्या सुरक्षेसाठी कार्य करण्यात सदैव अग्रेसर राहीले असून यामधे महिलांचे शोषण- उत्पीडन व त्रास, पुरुषांचे उत्पीडन व त्रास, हुंड्यासाठी त्रास, हुंडाबळी,अत्याचार, बलात्कार,महिलांचे हक्क व संरक्षण,बाल हक्क,बाल शोषण,बाल संरक्षण,श्रमिक शोषण,मानवी तस्करी,उपासमार, लुबाडणूक,खोटे आरोप, खोट्या केस मध्ये फसवणे, बेकायदेशीर कृत्य, भ्रष्टाचार, भीती, दहशतवाद, मानवाधिकार व मौलीक अधिकाराचे उल्लंघन, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, पोलीसांद्वारा अत्याचार व त्रासाविरुद्ध संरक्षण अधिकार, दलितांचे अधिकार, कामगारांचे अधिकार, समानतेचा अधिकार व सन्मानाने जगण्याचा अधिकार आदी समाविष्ट असून यांसह सर्व प्रकारच्या सामाजीक अनिष्ट प्रवृत्ती व घटनांच्या विरोधात कार्य करण्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजीक न्याय आयोग सदैव तत्पर व अग्रेसर आहे.   


                                          

शिरीषकुमार तोष्णीवाल यांचे मानवी अधिकार क्षेत्रात असलेले सामाजीक कार्य, जनसेवेतील सक्रियता, निस्वार्थी पत्रकारिता, देशभक्ती व राष्ट्रनिष्ठा पाहता पीडित व्यक्तींच्या न्यायहीतांसाठी शासन-प्रशासनाच्या सहकार्य व सहभागाने कार्य तसेच मदत करणे हेतू त्यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजीक न्याय आयोगाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड करणात आली. आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष बजाज द्वारा त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

close