एरंडोल : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणाची सुरुवात आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शहरातील अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
६ फेब्रुवारी रोजी एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणाचे उद्घाटन तालुक्याचे आमदार आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार चिमणराव पाटील म्हणाले सदरच्या लसीकरणाला कोणीही न घाबरता लसीकरण करून घ्यावे. मी स्वतः पारोळा येथे लसीकरण करवुन घेतले आहे. लसीकरणास सर्व वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर्स यांच्यापासून सुरुवात झाल्याने हे एक उत्तम उदाहरण या तालुक्यात पाहावयास मिळाले असल्याचे सांगुन एरंडोल येथील ट्रॉमा सेंटर उभारण्यासंदर्भात पाठपुरवठा करून तालुक्याच्या जनतेच्या आरोग्यासाठी व विविध उपचारासाठी सोय उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले तसेच एरंडोल येथे आरटीओ कॅम्प पुन्हा सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सुरुवातीला तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज शेख, डॉ.कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी, डॉक्टर वाणी, दिपक सोनवणे, जगदीश पाटील यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
याप्रसंगीमाजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शहर प्रमुख कुणाल महाजन, अतुल महाजन, शालिग्राम गायकवाड, आनंदा (भगत)चौधरी,बबलू पाटील, जावेद मुजावर, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, नितीन बिर्ला, डॉ.सुधीर काबरा,चिंतामण पाटील,माजी नगरसेवक सुनील चौधरी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

