shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तुकडेबंदी कायद्याचे विरोधात लवकरच अपील दाखल करणार - आप्पासाहेब ढुस

देवळाली प्रवरा- दि. ६ फेब्रुवारी.  
एकीकडे कोरोना महामारीने उत्पन्न घटले असून महसूल प्रशासनाणे काढलेल्या तुकडेबंदीच्या नोटीसीने नागरिक हवालदिल झाले आहेत. या नोटिसा म्हणजे आजोबाने घेतलेल्या जमिनीचा नातवाला भुर्दंड असे म्हणण्याची वेळ आली असल्याने तुकडेबंदीच्या जाचक कायद्या विरोधात अपील दाखल करण्याचा एकमुखी ठराव संमत झालेची माहिती  संघर्ष समिती चे अधक्ष्य आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले. 

महसूल प्रशासनाचे वतीने तुकडेबंदी विषयावर देवळाली प्रवरा येथील नागरिकांना प्राप्त नोटीसीवर चर्चा विनिमय करून पुढील निर्णय घेणेसाठी आयोजित बैठकीत ढुस बोलत होते. 

या पैठकीत आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांचेसह  राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, देवळाली प्रवरा शिवसेना शहर प्रमुख सुनील कराळे, देवळाली प्रवरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक तुषार शेटे,  योग प्रशिक्षक किशोर थोरात, डॉ. केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास पाटील, शिवसेनेचे संतोष चोळके, साई सेवा चे डॉ बबनराव वाकचौरे, प्रथितयश व्यापारी  राजकुमार छाजेड, श्रीमती मानिषाताई पोटे आदींनि भाषणातून या वसुली बद्दल आपले मत व्यक्त करून अपील दाखल करण्याच्या ठरवास एकमुखी मान्यता दिली.

या सभेत पुढे बोलताना ढुस म्हणाले की,  महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडनेस प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियम २०१७ अन्वये देवळाली प्रवरा हद्दीतील सन १९६५ ते २०१७ या कालावधीत २० गुंठे क्षेत्राच्या आतील तुकडे पडलेल्या १२३४ नागरिकांकडून जवळपास १८ कोटी रुपयांचा वसूल महसूल विभागाने वसुलपात्र ठरवून देवळाली प्रवरा हद्दीतील नागरिकांना तश्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. 

संपूर्ण राज्यात ही वसुली सुरू असल्याने महसूल प्रशासनाला व त्यांच्या वासुलीस आमचा विरोध नसून हा वसूल करण्यासाठी अस्तित्वात आलेला सुधारणा नियम नागरिकांसाठी जाचक आहे. व त्यानुसार जमिनीच्या आजच्या बाजार मूल्याच्या २५ टक्के रक्कम नागरिकांकडून वसूल करण्या ऐवजी ती जमीन ज्या वर्षी खरेदी केली त्या वर्षीचे बाजारमूल्य गृहीत धरून त्यावर २५ टक्के आकारणी झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. व त्या पद्धतीने आकारणी होण्याची कायद्यात तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी समिती वरिष्ठ पातळीवर योग्य त्या ठिकाणी लवकरच अपील दाखल करणार आहे, त्यासाठी सर्व नागरिकांनी संपर्क करण्याचे आव्हान समितीचे वतीने करण्यात येत आहे. 

तसेच ज्या नागरिकांना तात्काळ त्या जागेचे नियमितीकरन करून घ्यायचे असेल त्यांनी आलेल्या नोटीसीची रक्कम तहसील कार्यालयात भरून जागा नियमित करून घ्यावी व ज्यांना ही रक्कम भरणे शक्य नाही त्यांनी समिती सोबत अपिलात यावे असे आव्हाहन ढुस यांनी केले. 

या बैठकीस  आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, देवळाली प्रवरा शिवसेना शहर प्रमुख सुनील कराळे, देवळाली प्रवरा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक तुषार शेटे,  योग प्रशिक्षक किशोर थोरात, डॉ. केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास पाटील, शिवसेनेचे संतोष चोळके, साई सेवा चे डॉ बबनराव वाकचौरे, प्रथितयश व्यापारी  राजकुमार छाजेड, श्रीमती मानिषाताई पोटे,  भारत काळे, विजय पेरणे, मधुकर येवले, बाळासाहेब कोळसे, शिवाजी मुसमाडे, संभाजी वरघुडे, नवनाथ खेडकर, मोरे प्रकाश, वरखडे किसन , संतोष शिंदे, काळे प्रशांत, कचरू साळुंके, प्रवीण पाखरे , धनंजय डोंगरे, येवले जगन्नाथ, पोपट वाळुंज, जाधव कृष्णा, इंगळे गोरख, अनिकेत इंगळे, अविनाश गायके, विशाल नलावडे, काळे अक्षय,  कोळसे गोरक्षनाथ, सोपान सौदागर, राहुल हरदे, सय्यद जुबेर शदान शाह, कांतीलाल भंडारी , शेख मुनिर, संजय तांबे ,जगनाथ वरखडे,गणेश वरखडे , रंगनाथ आरंगाळे, अमोल मुसमाडे, गणेश बारावकर, विकास घटकांबळे आदींसह शेकडो नागरिक या बैठकीला हजर होते.

या बैठकीचे प्रास्ताविक आप्पासाहेब ढुस यांनी केले तर आभार योग प्रशिक्षक किशोर थोरात यांनी मांडले.  सभा  राहुरी फॅक्टरी येथील नोटीस धारक सुधाकर खेत्रे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
close