shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांच्यासाठी राज्याच्या कायद्यामध्येअंतर्भाव करून कायदा केला जाईल..उपमुख्यमंत्री ना.अजित पवार ..!!

 शेतकऱ्यांच्यासाठी  राज्याच्या कायद्यामध्ये अंतर्भाव करून  कायदा केला जाईल..उपमुख्यमंत्री ना.अजित पवार ..!!
इंदापूर प्रतिनिधी तात्याराम पवार: (दि.६ फेब्रु.२१)पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे इंदापूर तालुका विभागीय कार्यालय व नगर परिषदेचे विविध विकास कामाचे उद्घाटन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष प्रदीप गारटकर, मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सोनाई परिवाराचे दशरथ माने, छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे ,बँकेचे सर्व संचालक पदाधिकारी ,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे ,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, वैशालीताई नागवडे , अभिजित तांबिले कृषी उत्पन्न बाजार समिती तिचे सभापती दत्तात्रेय फडतरे,बाळासो करगळ, महिला अध्यक्षा पडळकर, हनुमंत बंडगर, महारुद्र पाटील ,सचिन सपकाळ ,अमोल पाटील ,शुभम निंबाळकर, नवीन ग्रामपंचायत सदस्य  व हजारोच्या संख्येने  कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अनेक वर्ष सगळ्याच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण केले, आजही शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करतात, निवडणुका जिंकतात पण शेतकऱ्यांना न्याय देत नाहीत, आज शेतकऱ्यांच वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन आहे, त्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,कांग्रेस पार्टी शिवसेना यांचा पाठिंबा आहे. केंद्रांनी शेतकरी कायदा केलेला राज्य सरकारने  केला नाही. त्यामध्ये महाराष्ट्र सरकार कायदा करणार आहे जे शेतकऱ्यांच्या हिताचे असेल तेच राज्याच्या कायद्यामध्ये अंतर्भाव करून  कायदा केला जाईल. त्यासाठी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना व शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. शेतकऱ्यांच्या हिताची तडजोड न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम निश्चितपणे झाले पाहिजे. भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नाही. देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात कुठल्याच शेतकऱ्याच्या वाट्याला अशी परिस्थिती आलेली दिसत नव्हती. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर निर्णय घेऊ. कर्ज नियमित फेडा . थकित असणाऱ्या शेतकऱ्यांनी विज बिल भरले तर इन्फ्रास्ट्रक्चर च्या माध्यमातून तालुक्यातील विद्युत कामे केली जातील. कृषी माध्यमाच्या योजनेतून पाच लाख सोलार पंप देण्याचे ठरवले आहे .पाण्याच्या प्रश्‍नाच्या माध्यमातून नीरा डावा कालवा चा प्रश्न सोडवला आहे. लाकडी निंबोडी चा प्रश्न  सोडविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेटफळ हवेली च्या तळ्याची उंची वाढवण्यास संदर्भात लवकरच निर्णय केला जाईल.   नीरा नदी व भीमा नदीच्या बंधाऱ्यांचे कामे केली जातील. उजनी जलाशयाच्या उपसा सिंचनाच्या माध्यमातून शेटफळगडे येथे पाणी आणून इंदापूर तालुक्याच्या खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी देण्यासाठी ची योजनेचे सर्वेक्षणाचे आदेश दिली असून बावीस गावाच्या पाण्याचा प्रश्न यानिमित्ताने सोडवण्याचे काम खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे करत असून त्यांना मी सहकार्य करत आहे. आपल्या कालव्याच्या क्षेत्रात पाणी कमी पडत असल्यामुळे उजनीच्या बॅक वॉटर क्षेत्रात बंधारे बांधण्याकरिता आपण त्याबाबत सर्वेक्षण करण्याचा आदेश दिले आहे .याचा फायदा इंदापूर तालुक्यातील जनतेला होणार आहे. पंचायत समिती व नगराध्यक्ष आमच्या पक्षाकडे आले. तर विकास कामासाठी यापेक्षा जास्त निधी देऊन विकास करू असे यावेळी स्पष्ट केले.

तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात म्हटले की,कोरोनाचे खूप मोठे संकट आपल्या देशावर राज्यावर आले. गेल्या दहा अकरा महीने कोणताही कार्यक्रम करता आले नाही. तुम्ही सर्वांनी मला मंत्री केलं. परंतु जाहीर असा कार्यक्रम घेता आला नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने आणि नगर परिषदेच्या निमित्ताने इंदापूर शहरात आज या कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इंदापूर तालुक्यातील ३० शाखा आहेत.गेल्यावर्षी ८४ कोटी १८ लाख रुपयाचा नफा झाला असून १७५३  कोटीचे कर्ज वाटप शेती आणि बिगर शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना शेतीसाठी, पाईपलाईन साठी तात्काळ कर्ज देणारी भारतातील गरिबांना कर्ज पुरवठा करणारी बँक म्हणजेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. गोरगरिबांसाठी फक्त जिल्हा बँकच आहे .इंदापूर तालुक्यातील  कार्यकर्त्यांनी निवडणुकीपर्यंत राजकारण केले पाहिजे. नगरपरिषदेसाठी नगरसेवक ज्यावेळी माझ्याकडे निधीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी दोन ते तीन कोटी निधी मागितली असता. माझ्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नगरपरिषदेला ३३ कोठी विविध विकास कामासाठी मंजूर करण्यात आले. राजकारण, पद हे फक्त मिरवण्यासाठी नसून जनतेची कामे करण्यासाठी असते. निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावाचा विकास कामाचा आराखडा तयार करून गावाचा विकास करावा. तसेच विकास कामाच्या आकडेवारी सांगताना भरणे पुढे म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यासाठी १५० कोठी तसेच रस्त्यासाठी ३९२ कोठी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत २०ते २५ कोठी, बोराटवाडी बंधाऱ्याच्या पुलासाठी १६ कोठी, खोरोची बंधाऱ्याच्या पुलासाठी १२ कोठी, दलित वस्ती सुधार योजनेसाठी ४.५० कोठी जिल्हा नियोजन मधून १३.५० कोठी, दलित वस्ती सुधार योजनेतून २० कोठीचा आराखडा तयार केला आहे. नरसिंहपूर येथील विकास आराखडा साठी  २८ कोठी मंजूर केले असून बजेट मध्ये १०२ कोठी तरतूद साठी  आहे . जल जीवन मिशन योजना मधून इंदापूर तालुक्यातील ७७ गावांची निवड केली असून ८० कोठीचा आराखडा तयार केला आहे .अशा पद्धतीने विकास कामांचा निधी व आराखडा चा इतिवृत्तांत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या सभेत मांडला
या कार्यक्रमात प्रदीप गारटकर रमेश थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
close