राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोजून दाखवले ४१ ग्रामपंचायतींचे सरपंच..!!
इंदापूर प्रतिनिधी:राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज भरणेवाडीत नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच, सदस्यांचा सत्कार कारण्यात आला.इंदापूर तालुक्यात कोणाच्या किती जास्त ग्रामपंचायती आल्या याच्यावरून सध्या वाद होत असताना,
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ४१ ग्रामपंचायतींचे सरपंच राष्ट्रवादी चे आले असल्याचं आज चक्क मोजून दाखविले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात म्हटले की,आज तालुक्यात सर्वांना बरोबर घेऊन कशी कामे करता येईल ते नेहमी करणार असून जे सरपंच झाले त्यांनी खूप मेहनत घेतली . त्या सर्व सरपंचांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आभार मानतो.
लाकडी निंबोडी चा पाण्याचा प्रश्न आहे. त्या ठिकाणचा सर्वे चालू असून जिरायती पट्ट्यातील लोकांचे पवार कुटुंबीय यावरती व राष्ट्रवादी काँग्रेसला कधी न सोडणारी मंडळी येथे हजर आहेत. बावीस गावाच्या पाणी प्रश्न मार्गी लावणार. मागील वेळी आपले सरकार नव्हते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून कामे करणार.
काही लोकांना तुमच्या पाण्याचे काही देणे घेणे नाही. पाणी कसे कमी पडेल. लवकर कॅनल कसा बंद होईल. ओरड कशी होईल.यावर काही लोकांची ही भावना असते. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. त्या लोकांचे शेतीवर काही अवलंबून नाही. आपले शेतीवर अवलंबून असते. आपल्या सारख्या शेतकऱ्यांचे पीक जळाले तर कितीतरी नुकसान होते .त्या पिकावर आपल्या मुला-मुलींचे लग्न असते. आपला घर प्रपंचाच्या असतो. दवाखाना शिक्षण ते सर्व शेतीवर अवलंबून असते. ह्या मोठ्या लोकांना तुमचं पीक जळाले तर काही देणेघेणे नाही .त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. बाकीचं काहीच करायचं नाही .आज जे काही तुमच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना घेऊन प्रामाणिकपणाने काम करीन. शरदचंद्रजी पवार यांनी ही लाकडी निंबोडी पाणी प्रश्न संदर्भात विचारणा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याहीपुढे गरज पडली तर मला त्या बैठकीला बोलवा अशी विचारणा केल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले देशाचा नेता आज इंदापूरचा कामासंदर्भात विचारना करतात. शरदचंद्रजी पवार किती मोठ्या मनाचे नेते आहे ते यावरून दिसते . जल मिशन जिल्हा कमिटी वरती प्रतिनिधी म्हणून माझी निवड केली आहे .आता पाण्याचा प्रश्न मिटवणार .गावाला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही .. तुमच्याकडे ३८ उपसरपंच होते तर का उघड ओळखपरेड केली नाही. तुम्हाला एवढी खात्री होती तर हा माझा सरपंच आहे . का सांगितले नाही . तालुक्यात वीस पंचवीस वर्ष खोटं सांगायचं .चांगलं केलं तर मी केलं चुकीचं केलं किंवा एखादा काही घडलं तर आम्ही असताना असं होतं नव्हतं. नेहमी लक्षात ठेवा आपला मुलगा आणि दुसऱ्याचा मुलगा आपलाच असतो. जोपर्यंत तुमची भावना होणार नाही ना तोपर्यंत तुमच्या मनात असंच राहणार. मला त्यांना विनंती करायची आहे की. आपण शांत व्हा .तुम्हाला जनतेने विश्रांती दिली आहे. तुम्ही विश्रांती घ्या. निवडणुकीच्या काळात तुम्हाला काय आरोप करायचे आहे ते करा. आमचा रिझल्ट ज्यावेळी दिसेल तेव्हा जनता ठरवल राष्ट्रवादीला निवडून द्यायचं की .भाजपला निवडून द्यायचं . असे आपल्या भाषणात भरणे यांनी व्यक्त केले.
याआधी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी यांना व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी निवडणुकीत कार्य केले. त्या सर्व कार्यकर्त्यांना व सरपंच उपसरपंच व नूतन ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन केले.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे कार्याध्यक्ष अतुल झगडे इंदापूरचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे. तसेच तालुक्यातील सर्व व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि सरपंच, उपसरपंच व नूतन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

