प्रतिनिधी, मोहन शेगर :
सोनई - आदर्शगाव मोरयाचिंचोरेत शिवजयंतीनिमित्त वृक्षारोपन... !
आदर्शगाव मोरयाचिंचोरे ता नेवासा येथे यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व सह्याद्री देवराई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रशांत गडाख व ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार डोंगरावर 391 वृक्ष लागवड करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
शिवजयंती निमित्त आदर्शगाव मोरयाचिंचोरे ता नेवासा येथे शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी 391 वृक्षांची लागवड करत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.
त्याप्रसंगी बोलताना प्रशांत गडाख यांनी समाजाला आज हिरव्या मशाली ची खऱ्या अर्थाने गरज आहे असे सांगितले. शिवजयंती निमित्त वृक्षलागवडीचा संकल्प या वर्षापासून करण्यात आला आपण शिवरायांचे मावळे आहोत आणि प्रत्येक गडावर आणि सह्याद्रीच्या कुशीत झाडांच्या हिरव्या मशाली वाढवू हा अभिनेते सयाजी शिंदे यांचा संकल्प मोरयाचिंचोरे येथील कार डोंगरावर पूर्णत्वास नेला.
गडावर मशाल घेऊन जाऊ परंतु "हिरवी ' मशाल गडावर घेऊन जाऊ - झाडाची मशाल कारण झाडा शिवाय गडाला आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या ना शोभा नाही त्यामुळे आज मानवी हस्तक्षेपामुळे उघडे बोडखे झालेले गड किल्ले व सह्याद्री डोंगररांगा शिवजयंती उत्सवानिमित्त वृक्ष लागवड व संगोपनाने हिरवीगार करुयात असे आवाहन व संकल्प सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे त्यांनी केला होता.
याप्रसंगी सरपंच सौ जयश्री राजेंद्र मंचरे, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष अंबादास इलग, उपसरपंच बाळासाहेब मोरे, कारभारी मोरे, गणेश मोरे , जालिंदर गवळी , अमृत पाटील, संदीप सरकाळे , प्रा. योगेश जाधव, देवदत्त दरंदले , समन्वयक बाबासाहेब दराडे , मुख्याध्यापक,शिवाजी कर्जुले ,स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व उपस्थितांनी शिवजयंती निमित्त वृक्षारोपन केले.

