प्रतिनिधी। मोहन शेगर:
सोनई (शनिशिंगणापूर ):रस्त्यावर गाडी आडवी लावुन चोरी करणारे सराईत गुन्हेगार गजाआड करण्यात शनिशिंगणापूर पोलिसांना यश मिळाले आहे.
वारंवार होणा-या महामार्गावरिल रस्तालुट-रॉबरी संदर्भात पोलिस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी सदर गुन्हे करणा-या आरोपींवर बारिक लक्ष ठेवुन तसेच सदर आरोपींनी गुन्हा केल्यास कसोशीने शोध घेवुल सदर गुन्हे उघडकीस आणने बाबत वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. काल दि.02 फेब्रुवारी 2021 रोजी ७:१५ वाजेचे सुमारास अहमदनगर ते औरंगाबाद हायवे रोडवर कांगोणी गावाचे शिवारात सुडके महाराज आश्रमाचे पुढे चांदा येथील राहणारे रविंद्र राजेद्र कदम (वय 25 वर्ष) रा. चांदा ता. नेवासा जि. अ.नगर यांना सदर ठिकाणी दोन अनोळखी इसमांनी मारहाण करुन त्यांचेकडे असलेले दोन तोळे सोन्याची चैन , 13500 रुपये रोख रक्कम तसेच 15000 रु किंमतीचा वीवो Y20 कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल त्यांना मारहाण करुन जबरीने चोरुन नेला होता.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन फिर्यादी यांना घटनेबाबत सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी त्यांना मारहान करुन जबरीने वस्तु चोरणा - या ईसमांचे वर्णन त्यांनी शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांना सांगितल्याने शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनचे अधीकारी व कर्मचारी यांनी तपासाचे सूत्र वापरुन गुप्त बातमीदारांना संपर्क करुन सदर घटनेचा लागलीच छडा लावण्याच्या दृष्टीकोनातुन फिर्यादी यांचेसह घटनास्थळाची पाहणी केली.
फिर्यादी यांनी सदर घटनेतील आरोपी याचे बाबत त्यांची उंची वर्ण बोलीभाषा कपड़े व गुन्हा करण्याची पद्धत ईत्यादी बाबत हकीगत , सांगितली असल्याने सदर आरोपी है सराईत मालमत्तेचे गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याचे प्रथम दर्शनी शोध पथकातील अधीकारी कर्मचारी यांना जाणवल्याने त्याप्रमाणे शनि शिंगणापुर पो.स्टेशन लगत असलेल्या टु प्लस रेकॉर्ड वरिल आरोपींच्या माहीतीची पडताळणी करुन संभाव्य आरोपी बाबत माहीती गोळा करण्यात आली.व त्या संदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात आले . दरम्यान शनिशिंगणापुर फाटा ते नेवासा दिशेला पो.स्टेशन हद्दीतील रोडच्या कडेला असलेल्या सर्व चहाच्या टप - या दुकानदार याना संशयीत हालचाली असलेले ईसम नेहमी गुन्हे करणारे आरोपी हे सदर ठिकाणी फिरकत असल्यास तातडीने माहीती देण्याबाबत याआधीच सुचना केल्या असल्याने गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सदर महामार्गावर दोन ते तीन ईसम संशयास्पद रित्या फिरत असल्याचे माहीती प्राप्त झाली होती.त्यानुसार बातमीची शहानिशा करून कांगोणी फाट्यापासुन जवळचे रस्त्याला लागुन ऊसाचे शेतामध्ये काही ईसम संशायास्पदरित्या थांबलेले दिसुन आल्याने त्यांना हाटकताच ते पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले.त्यावेळी शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनचे अधीकारी कर्मचारी यांनी अंत्यंत शिताफीने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.त्यावेळी सदर आरोपींना विचारपुस केल्यास त्यांनी आपले नाव नितीन मोहन राशिनकर (वय 27 वर्षे), वैभव बाबासाहेब घोडके (वय 19वर्षे) दोघे रा.कारेगाव ता.नेवासा असे सांगितले.
सदर ईसमांना विचारपुस करता ते प्रथम उडवा उडवीची उत्तरे देवु लागली परंतु त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी वर नमुद गुन्ह्याबाबत कबुली दिली असुन त्यांचेकडुन गुन्ह्यातील बळजबरीने चोरुन नेलेला मोबाईल हस्तगत केला आहे.तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल प्लॅटीना गाडी नं MH - 17 - CJ - 1879 ही हस्तगत करण्यात आलेली आहे.सदर वेळी अंधाराचा फायदा घेवुन 1 आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला असुन त्याचा शोध सुरु आहे.अशा प्रकारे गुन्हा घडल्यानंतर लागलीच 3 तासाचे आत गुन्ह्याची अंत्यंत शिताफिने उकल करुन आरोपी यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी गेलेला मुद्देमाल मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.वर नमुद कृत्याबाबत पोलिस स्टेशनला गु .र .नं 14/2021 भारतीय दंड संहिता 1860 कलम 394,341,323,504,34 , आर्म अँक्ट कलम 3/25 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हेगारापेकी नितीन मोहन राशिनकर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांनी जबरी चोरीचे अनेक गुन्हे केलेले असुन तो अंत्यंत सराईत गुन्हेगार आहे.
शनिशिंगणापूर पोलिस स्टेशनचे अधीकारी,कर्मचारी यांना गुन्ह्याची उकल करण्यास यश आलेले आहे.
सदरचा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली काळे,उपविभागिय पोलिस अधीकारी सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन बागुल , सफो गडाख , पोहेकाँ माळवे , पोहेकॉ देवकर , पोना शिंदे , चालक पोना शेख पोकाँ राठोड , पाकाँ वाघे मपोकाँ गोरे असे पथकाने सदरची कारवाई केलेली आहे .

