shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आझाद मैदान येथे मराठा समाज व विद्यार्थ्यांच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या आंदोलनास .. अंकिता पाटील यांनी दिली भेट..!!

आझाद मैदान येथे मराठा समाज व विद्यार्थ्यांच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून   चालू असलेल्या आंदोलनास .. अंकिता  पाटील यांनी  दिली भेट..!!

इंदापूर प्रतिनिधी:(३ फेब्रु.२१)मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या मुंबई-मेट्रो, तलाठी, महावितरण, महानिर्मिती, स्टेट बोर्ड महाराष्ट्र सेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध विभागातील निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेमध्ये घ्यावे याकरिता मुंबई येथील आझाद मैदान येथे मराठा समाज व विद्यार्थ्यांच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन चालू आहे. 

 या आंदोलनाला पुणे जिल्हा परिषद सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्ष कु अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी भेट देत या विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या व  या आंदोलनाला व विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

यावेळी कु.अंकिता पाटील म्हणाल्या की, हे विद्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. माझी सरकारला एक नम्रपूर्वक विनंती आहे की या विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या आपण सोडवाव्यात व तात्काळ या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे.
close