shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील रस्त्याकरिता सुमारे नऊ कोटींचा निधी मंजूर- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती..!!

इंदापूर तालुक्यातील रस्त्याकरिता सुमारे नऊ कोटींचा निधी मंजूर- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती..!!
 
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्या करिता ८ कोटी ८० लाख एवढा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असून               जिल्हा नियोजन समिती अंतर्गत लेखाशिर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने व गावोगावी रस्त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.३०५४अंतर्गत कामे खालील प्रमाणे:       जाधववाडी ते सराफवाडी रस्ता २५ लक्ष,              मदनवाडी सकुंडे वस्ती रस्ता २५ लक्ष,                  अंथूर्णे मस्के वस्ती बिरोबा मंदिर रस्ता १ कोटी               अंथूर्णे मस्के वस्ती खराडे वस्ती इरिगेशन बंगला रस्ता ९० लक्ष ,काझड ते बापूराव पाटील काळेमळा ते डुमकुरेवस्ती २५लक्ष ,कुरवली मोहिते वस्ती रस्ता बंबाडवाडी पर्यंत रस्ता ९० लक्ष ,पिंगळे वस्ती कांबळे वस्ती मोरे वस्ती ते अवसरी रस्ता ६० लक्ष, जंक्शन वाडकर लोदाडे वस्ती रस्ता करणे ७० लक्ष,   थोरातवाडी हिरेमठ मळा मोहिते वाडी रस्ता ३० लक्ष, गोंदी ते ओझरे रस्ता ५० लक्ष, काझड रानमळा नरुटे वस्ती रुपनवर वस्ती ते ग्रामा ४३ रस्ता १ कोटी , जाचक वस्ती ते ननवरे वस्ती ते थोरात वस्ती रस्ता ४० लक्ष ,अंथूर्णे ते शिंदे वस्ती जोड मार्ग रस्ता ६० लक्ष,रामा १२१ ते हनुमान वाडी रस्ता ६० लक्ष ,वडापुरी अवसरी ते प्रजिमा १२५ रस्ता २५ लक्ष,लेखाशिर्ष ५०५४ अंतर्गत रामा १२१ ते येशु पारवाडी लासुरणे चिखली मार्ग सुधारणा करणे ३० लक्ष अशा पद्धतीने इंदापूर तालुक्यातील रस्त्याची मंजुरी घेतली आहे.
close