सातारा (पाटण तालुका प्रतिनिधी):
मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या खेडेगावतील कलाकारांना संधी मिळण्यासाठी महेश मसकर यांची नेहमीच मदत होत असते.जे नवोदित कलाकार आहेत ज्यांना संधी उपलब्ध होत नाही अशा कलाकाराना संधी उपलबध करुन देण्याचे काम महेश मस्कर करत असतात.
याआधी सुध्दा त्यांनी बर्याच कलाकारांना संधी मिळवुन दिली आहे. झी मराठीवरील सध्या सुरु असलेली मालिका "येऊ कशी तशी मी नांदायला" या मालिकेमध्ये पाटण तालुक्यातील मस्करवाडी नं१ मधील कन्या एेश्वर्या मस्कर, तृप्ती बनकर , श्वेता प्रभु , प्रतिक साबळे यांसारख्या नवोदित कलाकारांना महेश मस्कर यांनी संधी उपलबध करुन दिली.याबद्दल सर्व नवोदित कलाकारांनी त्यांचे आभार मानले.
यापुढेदेखील नवोदित कलाकारांना संधी उपलबध करुन देईन असे महेश मस्कर यांनी सांगितले.

