shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

71 वा अभिष्टचिंतन सोहळा...!श्री मोहनराव हनुमंत येळवंडे (आण्णा)


प्रतिनिधी(मोहन शेगर):
सोनई पासून काही अंतरावर बेल्हेकरवाडी शिवार नवनाथनगर येथे त्यांची व बंधूची एक छोटीशी बसलेली वस्ती त्यांच्या सभोवती इतर समाज घटकांच्या बसलेल्या वस्त्या( नवनाथनगर) संपूर्ण सुखसोयी भरून असलेले.
परिसरातील जनतेशी नेहमी एकोप्याने राहणारे.अण्णांचे दोन मुलं रामेश्वर कानिफनाथ.सुना नातवंड...,अण्णाच्या आई चे वय आज  १०५  वर्ष आहे.

अण्णाना चार भाऊ, चार पुतणे व सात पुतण्या संसाराचा मोठा राजवाडा आहे....
असा त्यांचा मोठा विचारवंत येळवंडे परिवार. त्यांच्या जीवनामध्ये ते दत्त महाराजांना,गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांना आपले गुरु मानणारे...; वस्ती पाशी सुंदर दत्त गुरुचे मंदिर. 

आपले दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला ...
(आण्णा) त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा राजकीय प्रवास
खूप निष्ठावंत पणे पार पाडत....
नेहमी खांद्यावर घेतलेली बाजू प्रामाणिकपणे आपल्या नेत्यासाठी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून निभावत राहत...
त्यांनी एकदा दिलेला शब्द ते प्रामाणिकपणे त्यांच्या जीवनामध्ये ते निभावत राहिले...

अण्णा राजकारणामध्ये कधीच कोणत्या गोष्टीला डगमगले नाही. जशी स्वतःची तब्येत रुबाबदार,  प्रसन्न चेहरा तसेच नेहमी खंबीर नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व...
त्यांच्या तरुण वयामध्ये मुळा सहकारी साखर कारखाना सोनई...मध्ये  ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऊस वाहतुकीचे काम त्यांनी केलं.

त्या कष्टाचे फळ त्यांना आदरणीय खासदार यशवंतराव गडाख पाटील साहेब यांनी  तीन वेळेस (आण्णाला) कारखान्याचे डायरेक्टर पद देऊ केले . पदाचा आधाराचा विचार करून .
नेहमी साहेबांचे विचार घेऊन चालत राहिले...

आदरणीय साहेबांचे खूप विश्वासू म्हणून (अण्णांची) परिसरामध्ये एक ड्रायव्हर ते डायरेक्टर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट शेतकरी ऊस उत्पादक म्हणून नेहमी परिसरामध्ये आपला ठसा उमटत राहिले...
अण्णाचा  मनाचा खूप मोठेपणा केला त्यांच्या राजकीय जीवनातील खूप मोठी भेटच गडाख साहेबांनी त्यांना दिली.

योगायोग २०२१ मध्ये अण्णांच्या ७१ अभिष्टचिंतन आणि त्यामध्ये बेल्हेकरवाडी गावाने त्यांना सरपंचपदाचा तुरा दिला.
खूप अमुल्य विस्मरणीय अशी त्यांच्या जीवनातील भेटच आहे.असाच आपल्या सर्वांचा गोड माणूस श्री मोहनराव येळवंडे (आण्णा) ७१ अभिष्टचिंतन सोहळा १८/२/२०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता होत आहे.
आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. 
ही नम्र विनंती.

समस्त येळवंडे परिवार
नवनाथ नगर .
close