shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापूरी येथे विहिरीत पडलेली दोन बैल क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात यश..!!

वडापूरी येथे विहिरीत पडलेली दोन बैल क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात यश..!!
इंदापूर प्रतिनिधी: (१ मार्च. २१)वडापुरी येथील पिंगळे वस्ती या ठिकाणच्या विहिरीत पडलेले मोकाट बैल टकरी खेळत विहिरीत पडले असता- क्रेनच्या साह्याने चार तासाच्या प्रयत्नातून अखेर बैल जोडी बाहेर काढण्यात यश आले. व्यवस्थित पद्धतीने बैल बाहेर काढण्यात यश आल्याने उपस्थित ग्रामस्थांनी आनंदाचा सुस्कारा टाकला.
वडापुरी येथील पिंगळे वस्ती या ठिकाणी पांडुरंग किसन पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत पहाटेच्या वेळी दोन बैल एकमेकांबरोबर  टक्करी खेळत दोन्ही बैल  विहिरीत पडले. या दोन्हीच्या आक्रमणात  सदरच्या शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसानही झालेले दिसून आले आहे.  अशा परिस्थितीत ते विहिरीत पडलेले दिसून आले .त्याची पाहणी सदरील शेतकरी आणि शेजारी राहणारे वडापुरी गावचे सरपंच संगीता तरंगे व पिंगळे वस्ती येथील पुरुष व महिला हे पाहण्यासाठी आले, असता त्या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे व तेथील ग्रामस्थ यांनी या बैल जोड यांना बाहेर काढण्यासाठी दोरी चा उपयोग केला असता ते त्या दोरीमध्ये  सापडले नाहीत. अनेक पर्याय उपयोगी मार्ग करून पाहिले .तरी सदर बैलांना बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी जय भवानी क्रेन सर्विस यांची क्रेन बोलावून घेतली. या क्रेन च्या साह्याने दोरी व पट्टे टाकून  बैलांना आडकवण्याचे कार्य शिवाजी गहिनीनाथ जाधव यांनी प्रत्यक्ष दोरीच्या साह्याने लटकत केले. मोकाट असलेली ही जनावरे जबरदस्त ताकद अंगात असल्याने माणसाला जवळ फिरकू देत नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष पकडण्या मध्ये प्रयत्नाची पराकाष्टा खूप वेळ करावी लागली. शेवटी त्यांना पट्ट्यांच्या साह्याने गुंतवून लटकवून बाहेर काढण्यात यश आले. 
याप्रसंगी शिवाजी गहिनीनाथ जाधव, संभाजी पवार, अंकुश पासगे, तानाजी पिंगळे, पांडुरंग पिंगळे, सुरेश चंदनशिवे, नामदेव काळे, महादेव तरंगे, प्रकाश करगळ ,पांडुरंग शंकर पिंगळे, ज्योतीराम पवार,स्नेहल तरंगे, डॉक्टर घुगे व उपस्थित नागरिक यांनी  विशेष प्रयत्न केले.
सदर बैलांना बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तास लागले असून बैल व्यवस्थित बाहेर काढण्यात आल्याने उपस्थित ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती आनंद उत्साह दिसून आला. खरंच आज ही बैलजोडी कोणाच्याही मालकीची नव्हती तरी अशा मोकाट फिरुन जगणारी जनावरे होती. या बैलावर ज्यावेळी संकट निर्माण झाले. त्यावेळी सर्व ग्रामस्थ प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने त्यांना विहिरीतून बाहेर सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. अतिशय लहान मुलं ही त्यांना वाचवण्यासाठी धडपड करीत होते .यावरून माणूस आजही पशु पक्षांविषयी किती संवेदनशील आहेत. त्यांचे दर्शन पिंगळे वस्ती याठिकाणी या विहिरीवर बघण्यास मिळाले. या ठिकाणी या बैलांना बाहेर काढण्यासाठी कशा पद्धतीने कसरत करावी लागते. किती मेहनत घ्यावी लागते. याचेही दर्शन जाधव यांच्या माध्यमातून दिसून आले. या बैलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या सर्व नागरिकांचे श्रीनाथ सोसायटीचे चेअरमन किसन सावंत  व तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे यांनी विशेष आभार मानले.
 यावेळी या मोकाट जनावरांपासून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पांडुरंग पिंगळे यांनी निदर्शनास आणून दिल्याने  होणाऱ्या त्रासाचा पर्यायी मार्ग काढण्यासाठी  लवकरच सर्वांच्या वतीने निर्णय घेण्याचे श्रीनाथ सोसायटी चे चेअरमन किसन सावंत यांनी  सांगितले.
close