shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिठेवाडी येथे ग्रामस्थांच्यावतीने शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!

पिठेवाडी येथे ग्रामस्थांच्यावतीने शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!
इंदापूर प्रतिनिधी:पिठेवाडी येथे शहीद सुभेदार लक्ष्मण सत्तू  डोईफोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करून पिठेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी सैनिक दादासाहेब बरकडे यांनी उपस्थितांना देशसेवा आणि देशासाठी सैनिकांचे योगदान व बोराटवाडी गावचे शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्या आठवणींना जागे करत त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभावी. 
तसेच पिठेवाडी ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सर्व ग्रामस्थ सामील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी भारत माता की जय. अमर रहे अमर रहे शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे अमर रहे . वंदे मातरमअशा जय घोषणा देण्यात आल्या.
  यावेळी पिठेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
close