सरकारच्या चुकीच्या धोरणावर येथील सामान्य माणसालाच बोलावे लागेल. आणि तो जर आज शांत बसला तर एक वेळ अशी येईल कि त्याला काहीच बोलण्याची संधी मिळणार नाही.
सोशल मीडियावर सरकारने जाहीर केलेली बंधनं याचेच प्रतीक आहे. व्यक्त व्हा , व्यक्त होणं जर थांबलं तर हा देश परत गुलामीत गेल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणावर कसलीही भीती न बाळगता बोट ठेवा. कारण सरकार आपल्या सेवेसाठी आहे आपण त्याच्या सेवेसाठी नाही.
मला इथे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी म्हटलेले उद्धृत करावेसे वाटते. ते म्हणतात कि, नागरिकांचे अधिकार हे सरकारच्या टिकण्यापेक्षा कितीतरीपटीने महत्वाचे आहे आणि ते टिकवण्यासाठी त्यांनी शेवट पर्यंत प्रयत्न करायला हवा.
अशोक सब्बन
✍✍✍✍

