इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करिता रु १६ कोटी निधी मंजूर-सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे..!!
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यात आँक्टोंबर मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती.यात मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणच्या रस्त्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे दळणवळण च्या दृष्टीने नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग भिगवण व इंदापुर साठी दोन्ही विभागात मिळून ३१ कामांसाठी रु.१६ कोटो निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
दत्तात्रय भरणे यांनी सांगितले कि, इंदापूर तालुक्यातील पूरहानी झालेल्या भागाची मी पाहणी केली होती. त्यावेळी संबंधित यंत्रणेला तात्काळ व योग्य पध्दतीने पंचनामे करणे बाबत निर्देश दिले होते.त्याअनुषंगाने भिगवण विभागात रा.मा. ५४ भिगवण-बारामती रस्ता ते मदनवाडी घाट लामजेवाडी रस्ता दुरुस्ती करिता रु.१७.३८ लक्ष, भवानीनगर जाचकवस्ती काझड अकोले रस्ता रा.मा. ९ रस्ता रा.मा.क्र.१३२ ( जाचकवस्ती काझड भाग, वाहून गेलेल्या भराव्यासाठी ) रु.६९.५३ लक्ष, कळस जंक्शन वालचंदनगर रा.मा.१२४ ( कळस ते वालचंदनगर मोऱ्या वाहून गेलेला भरावा, कळंबोली पुलाचे रोलिंग ) रु.९७.३४ लक्ष असे एकूण ३ कामांसाठी रु.१८४.२५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच लाकडी -कळस रस्ता प्रजिमा ६५ करीता रु.१९.७८ लक्ष, अंथुर्णे शेळगाव रस्ता प्रजिमा ७६ करिता रु.३४.९४ लक्ष, कळंब लासुर्णे रस्ता करीता रु.२६.३७ लक्ष, भिगवण स्टेशन भिगवण ते रा.म.मा.९ रस्ता प्रतिमा ७९ करिता रु.१.९८ लक्ष, म्हसोबाची वाडी निरगुडे भादलवाडी डाळज नं.२ कुंभारगाव पोंदवडी शेटफळगडे रस्ता निरगुडे येथील वाहून गेलेल्या तळी पुलाच्या ठिकाणी छोटा पूल बांधणे, डाळज नं.२ येथील वाहून गेलेल्या जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधणे रु.६१३,०० लक्ष, रणगाव शिरसटवाडी रस्ता करिता रु. १६.४८ लक्ष, कळस शेळगाव रस्ता र.५.१३ लक्ष, खडकी पारवडी शेटफळगडे लाकडी भवानीनगर सणसर कुरवली रस्ता (कारखान्यानवळील खराब रस्ता दुरुस्ती करणे) रु.४६.१५ लक्ष, म्हसोबाचीवाडी लाकडी काझड बोरी लासूर्णे रस्ता दुरुस्ती करणे करिता रु.१९.७८ लक्ष, बोरी शेळगाव रस्ता दुरुस्ती करणे रु. १३.१९ लक्ष, रा.मा. १२१ अंथुर्णे भरणेवाडी बिरंगुडबाडी रस्ता दुरुस्ती करणे रु. ६.५९ लक्ष, रा.म.६५ ते पळसदेव माराव्दादी कळस बोरी रस्ता दुरुस्ती रु. १३.१९ लक्ष असे एकूण १२ कामांसाठी रु. ८१८.२६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच इंदापूर विभागात श्रीराम चौक ते इजगुडे पंप रु. ३१.२९ लक्ष, गणेशवाडी पुल व निरा नदीवरील पूल नरसिंहपुर रु.३४.७६, कँनाल मोऱ्या रेडणी ते खोरोची रु.१९.७८ लक्ष, सावंत वस्ती पूल रु.२८.३५ लक्ष,खोरांची गावाजवळचा पुल रु.७५.८१, कळाशी ते गंगावळण पूल रु, रु.२६.३७, राजेवाडी बँक वाॅटरपुल रु.१६.४८ लक्ष, रेडा ते निरा भिमा नदीवरील पूल रु.६२,६३ लक्ष, तरंगवाडी गोडाऊन जवळील पूल दुरुस्ती रु. २३.०७ लक्ष,अगोती नं.१ चांडगाव भराव दुरुस्ती १२७ - रु. ४२.८५ लक्ष, अकलूज रस्ता ते शेटफळ हवेली पूल बांधणे रु.४६.१५ लक्ष, म्हेत्रे वस्तीजवळील पूल शिरसीडी ते इंदापूर रु.१३१.८५ लक्ष, सावंत वस्ती पुल रु.१७.५८ लक्ष, सावंतवस्ती भाटनिमगाव पूल रु.८.५७ लक्ष, पाणंद रस्ता दुरुस्ती निमगाव केतकी जवळ रु.१६.४८ लक्ष, खोरोची पूल व ३ मोऱ्या दुरुस्ती रु. १९.७८ लक्ष असे एकूण १६ कामांसाठी रु.६००,०० लक्ष निधी मंजूर करण्यात आला.

