shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर नगर पालिकेच्या गलथान कारभारामुळे साथीच्या रोगाला निमंत्रण ?

श्रीरामपूर- एकेकाळी स्वच्छ आणि सुंदर शहर असलेल्या श्रीरामपूर शहराला सध्या घाणीच्या साम्राज्याने घेरले आहे,गल्लो - गल्ली कचर्याचे ढिगारे सोबतच नाल्या नेहमीच्याच तुंबलेल्या शहरात सर्वत्र घाणच घाण दिसून येत असल्याने या स्वच्छ आणि सुंदर शहराचं रुपांतर आता जणू घाणीच्या शहरात झालं असल्याचे दिसून येत आहे.पहिलेच कोरोना सारख्या भयंकर संकटातून संपूर्ण जग जात असताना श्रीरामपूर शहर जणू त्यात आणखी भर घालून साथीच्या आजाराला निमंत्रण देऊ पहात आहे.


शहराची साफ-सफाई घनकचरा ठेकेदाराच्या माथी मारुन नगर पालिका प्रशासन कसे काय स्वत:ला नामनिराळे म्हणून घेऊ शकते ?जनतेने घनकचरा ठेकेदाराला नव्हेतर विद्यमान नगरसेवक/नगराध्यक्षांना आपली सेवा करण्यासाठी निवडून दिलेले आहे हे कसे विसरुन चालणार ?यात सत्ताधारी नगरसेवक जितके शहरातील जनतेचे सेवक देणेकरी लागतात तितकेच विरोधी पक्षातील नगरसेवकांचीही जबाबदारी आहे हे तरी कसे नाकारुन चालणार ?

निवडणुकीच्या वेळी मतदार जे मतदान करतात ते नागरी समस्यांचे निवारण होण्यासाठी, मात्र निवारण होणे तर दुरच उलट समस्या वाढीस लागल्यास मतदारांचे भ्रमनिरास झाल्याशिवाय राहत नाही.याकरीता मा.मुख्याधिकारी श्रीरामपूर नगरपालिका प्रशासन यासोबतच सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटातील नगरसेवकांसह विद्यमान नगराध्यक्षा मॅडम यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाकडे कटाक्षाने लक्ष द्यावे आणि या घाण-कचर्यामुळे शहराला संभाव्य साथीच्या आजारांची समस्या निर्माण होऊ नये याची वेळीच दक्षता घेऊन योग्य उपाय योजना कराव्यात अशी शहरातील नागरीकांकडून अनेक दिवसांपासून मागणी होत आहे.
close