shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रेकींग न्युज:गोदावरी उजव्या कालव्यातील वाहत्या पाण्यात सावळीविहीर निमगाव परिसरात 65 वर्षेीय पुरुषाचे आढळले शव..!


सावळीविहीर( प्रतिनिधी):
गोदावरी उजवा कालव्याच्या वाहत्या पाण्यामध्ये राहाता तालुक्यातील सावळीविहीर परिसरात एक 65 वर्षेिय पुरुषाचे शव तरंगत आले असून ते या कालव्यात सापडले आहे.

या सापडलेल्या 65 वर्षीय मृत व्यक्तीचे शवविच्छेदन जागेवरच करण्यात येत असून यासंदर्भात वेगवेगळी चर्चा येथे होताना दिसून येत आहे. ही आत्महत्या आहे की घातपात आहे.याचीही चर्चा होत आहे.मात्र 65 वर्षीय हि मयत व्यक्ती  कोण, कुठली असून हि  आत्महत्या आहे की घातपात आहे. याची चौकशी सुरू आहे.

यासंदर्भात अधिक माहिती की, आज 28 फेब्रुवारी रविवार रोजी दुपारच्या दरम्यान सावळीविहीर निमगाव परिसरातून जाणाऱ्या गोदावरी उजव्या कालव्याला सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे.या वाहत्या पाण्यामध्ये 65 वर्षीय पुरुषाचे शव तरंगत असल्याचेआढळून आले.नागरिकांनी या संदर्भात पाहिल्यानंतर पोलिसांना खबर दिली.घटनास्थळी शिर्डी पोलिस तात्काळ दाखल झाले असून हे शव पाण्याबाहेर काढले. 

दरम्यान घटनास्थळी शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस दाखल झाले असून पंचनामा करुन शवविच्छेदन जागेवरच करण्यात येत आहे.यासंदर्भात आपापसात वेगवेगळी कुजबूज ऐकू येत असून शिर्डी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव ,पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर व पोलिसांची चौकशी झाल्यानंतरच हा प्रकार नेमकी घातपात आहे की आत्महत्या हे उघड होईल असे ही चर्चा आता नागरिक करत आहेत.
close