shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे शहरात हद्दीतील शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस 14 मार्च पर्यंत बंद..!!

पुणे:-पुणे शहरात हद्दीतील शाळा, महाविद्यालये आणि खाजगी क्लासेस 14 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुणे शहरातले महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महापौरांनी ट्विट केले आहे.

पुणे शहरात शनिवारी (दि. 27) 8 हजार 41 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यात 739 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 412 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सहा जणांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या शहरातील चार हजार 574 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान या काळात ऑनलाईन शिक्षणाला परवानगी असणार आहे.

पुणे शहरात रात्री 11 ते सकाळी सहा या वेळेत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, शिफ्ट मध्ये काम करणा-यांना या वेळेत मुभा मिळेल. अनावश्यक फिरणा-यांवर कारवाई सुरु राहणार असल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले आहे.
close