shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगाव पोलीसांची अवैध दारू विक्रेत्या विरुद्ध दबंग कारवाई..!!


(धाड सत्रात केला १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त)

( बारा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल)

हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख
दि.२६,हिंगोली जिल्हयातील सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पानकनेरगाव, मकोडी, वेलतुरा या ठिकाणी अवैधरित्या बेकायदेशीर दारू विकणाऱ्या बारा जणांविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल केला असून या धाड सत्रात १ लाख २९ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सेनगाव पोलीस अवैध दारू विक्री विरोधात आत्ता अक्शन मूडमध्ये दिसत असून प्रथमच सेनगाव पोलिसांनी अवैध दारू विक्री रणार्‍याविरुद्ध दबंग कारवाई करण्यात आली आहे.

 
सेनगाव ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री चा बाजार मोठ्या प्रमाणात फोफावला असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त असल्याने सेनगाव पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी आलेल्या तक्रारीची दखल घेत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे त्या पथकामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल पंजाबराव लेकुळे, गोपनीय शाखेचे पोलीस नाईक रमेश कोरडे, श्रीराम पुरी, संदीप सोनटक्के यांचा समावेश करण्यात आला आहे सेनगाव ठाणे हद्दीत २६ फेब्रुवारी शुक्रवार रोजी मकोडी येथील संतोष रामचंद्र राठोड वय ३२ वर्षे यांनी मकोडी शेत शिवारात नामदेव लोभाजी राठोड यांच्या शेताच्या बाजूला नदीपात्रात बेकायदेशीर अवैधरित्या  गावठी हातभट्टी दारू बनवीत असताना रंगेहात पकडून यांच्याकडून १००० रुपयांच्या प्लास्टिक कॅन त्यामध्ये दहा लिटर गावठी दारू असलेल्या प्रत्येकी १०० रुपये लिटर प्रमाणे ४५०० रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू व गावठी हातभट्टी दारू बनवण्यासाठी गुळाचे सडके रसायन प्रत्येकी पिप्या मध्ये १५ लिटर प्रमाणे ९० लिटर रसायन प्रत्येकी ५० रुपये लिटर ५५०० रुपये किमतीचा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी संतोष राठोड हा स्वतःच्या फायद्यासाठी गावठी हातभट्टीची दारू विनापरवाना बेकायदेशीर चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगत असताना आढळून आला आहे  . फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कलम ६५( ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर हद्दीतील पानकनेरगाव येथे जुन्या हिरो कंपनीच्या स्प्लेंडर मोटर सायकल वरून एका पांढऱ्या रंगाच्या थैली मध्ये देशी दारू भिंगरी संत्रा लेबल असलेले ४ बॉक्स ज्याची किंमत १०००० रुपये व एक जुनी मोटर सायकल ज्याची किंमत ५० हजार रुपये असे एकूण सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी काना सुरेश उगले वय २१ वर्ष राहणार मालेगाव नाका रिसोड तालुका रिसोड जिल्हा वाशिम शिवराज महादेव खिराडे वय २० वर्ष राहणार असं गल्ली रिसोड हे दोन्ही आरोपी विनापरवाना रिसोड येथून अवैधरीत्या दारूची चोरटी वाहतूक करून सेनगाव ठाणे हद्दीत बेकायदेशीररित्या इतर अवैध दारू करताना दारू पुरवठा करण्याच्या उद्देशाने त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक श्रीराम पुरी यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात कलम ६५( ई ) ८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ठाणे हद्दीतील यलतूरा येथे करण्यात आलेल्या कारवाईत अवैधरित्या देशी दारूची चोरटी वाहतूक करून जयपूर येथे द्वारपोच अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमांना दारू पुरवण्याच्या उद्देशाने देशी दारू भिंगरी ज्याची किंमत १४ हजार ३६० रुपये व एक दुचाकी ज्याची किंमत ५० हजार रुपये असा एकूण ६४ हजार ३६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी हिरारतन काळे वय २९ वर्षे राहणार लोणी फाटा रिसोड यांच्याविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल  पंजाबराव लेकुळे  यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसात ९ आरोपीविरुद्ध दारूबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा ठाणे हद्दीत केलेल्या तीन धाडी सत्रात १२ आरोपीवर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सेनगाव पोलीस अवैध दारू विक्री विरुद्ध कठोर कारवाई करत असल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले असून अनेकांनी आपल्या अवैध धंद्याला फुलस्टॉप दिल्या असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे हे धाडसत्र ठाणे हद्दीत नेहमीच राहणार असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव, अभयकुमार माकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून संपूर्ण ठाणे हद्दीत होत असलेली अवैध व बेकायदेशीर दारू विक्रीला लगाम बसण्यास हे धाडसत्र मोहीम प्रभावी ठरत आहे.


सेनगांव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे खपून घेणार नाही:- पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील

सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीत कुठलेही अवैध धंदे खपवून घेतल्या जाणार नाही असा सज्जड दम पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी अवैध धंदे चालकांना दिला आहे ठाणे हद्दीत होत असलेली अवैध दारू विक्री व इतर अवैध धंदे कायम बंद करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली असून या पथकाद्वारे ठाणे हद्दीत असलेल्या अवैध व्यवसाय विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असून ठाणे हद्दीत कुठलेही अवैध धंदे चालकाचे व कायदा सुव्यवस्था बाधित करणाऱ्याची गय केली जाणार नसून त्यांच्याविरुद्ध कठोर शासन करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी दिली
close