शारदा शेतकरी माता-भगिनी अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाची मंजुरी -अंकिता पाटील..!!
इंदापूर प्रतिनिधी: बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्यावतीने शारदा शेतकरी माता-भगिनी अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाची मंजुरी मिळाली असून मंजुरीचे पत्र लाभार्थ्यांना दिले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी दिली
पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्यावतीने विधवा, शेतकरी महिला, घटस्फोटित, परितक्ता व निराधार महिलांसाठी शारदा शेतकरी माता-भगिनी अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील रतन सातपुते, ज्योती भोरडे, लता निकम, विमल क्षिरसागर, बाई ढोले, अनुराधा तोंडे, अलका गाडे, सुनिता हावळे, दिलशाद पठाण व शशिकला शिंदे यांना प्रत्येकी पाच हजार रुपये मंजूर झाले आहेत.
या मंजुरी पत्र बावडा येथे अंकिता पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले.
सध्याची कोरोना पार्श्वभूमी अशा परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार असल्याने लाभार्थ्यांनी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांचे आभार मानले.
यावेळी बावड्याचे सरपंच किरण पाटील तसेच विकास पाटील उपस्थित होते.

