shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दि.१ मार्च ते ७ मार्च संचारबंदी दरम्यान पोलीस प्रशासनास सहकार्य करा-पो. नि.पाटील..!!


हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि२०,हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्री.रुचेशजी जयवंशी साहेब यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्हयात दि.०१ मार्च ते ०७ मार्च पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली यामध्ये दुकाने बंद असणार आहेत.सदर काळात औषधी दुकाने,दुध विक्री केंद्र,दुध विक्रेते सह अत्यावश्यक सेवा यांना सवलत दिली आहे.तरी सेनगांव पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व नागरीकांनी विनाकारण रस्त्यावर फिरुन संचारबंदीचे उल्लंघन न करता घरीच राहा,सुरक्षित राहा व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी नागरीकांना केले आहे.



हिंगोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्री.रुचेशजी जयवंशी साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हयात दि.०१ मार्च सोमवार ते ०७ मार्च रविवार पर्यंत संचारबंदी लागु करण्यात आली या काळात फक्त औषधी,दुध विक्री केंद्र,दुध विक्रेते व अत्यावश्यक सेवेसाठी सवलत दिली आहे.तसेच रस्त्यावर विनाकारण फिरल्यास कारवाई करण्याचे आदेश आहेत तरी सर्व नागरीकांनी या काळात संचारबंदीचे उल्लंघन न करता आप-आपल्या घरी राहुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे व विनाकारण रस्त्यावर न फिरता आपल्या विरोध होणारे कारवाई टाळावी.तसेच कोनती ही दुकाने चोरी-छुपे चालु करत व्यवसाय केल्याचे निदर्शनास आल्यास त्या दुकानदारावर कडक कारवाई करण्यात येईल.सध्या महाराष्ट्र सह जिल्हयात कोरोना-१९ संसर्ग वाढल्याने संचारबंदीचा निर्णय नागरीकांच्या हितासाठी व सुरक्षित राहाण्यासाठी आहे.या संचारबंदीचे उल्लंघन न करता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सेनगांवचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कृष्णदेव पाटील यांनी केले आहे.
close