पिंपरी चिंचवड:-पिंपरी चिंचवड शहरात अनेकशैक्षणिक संस्था आहेत .मार्च 2020ते मार्च 2021 च्या काळात शैक्षणिक वर्षांत कुठल्याही प्रकारचे वर्ग चालू नसताना फक्त ऑनलाईन लेक्चरच्या नावाखाली जिमखाना फी, लायब्ररी फी,स्पोर्ट्स फी,या शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांकडून वसूल करत आहे तरी या सर्व फीचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसत आहे.
तरी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व संस्थांना आपण समज देऊन सर्व फी माफ करून देण्यात यावी.अशा मागणीचे पत्र युवा सेना सचिव वरून जी सरदे साई यांना पिंपरी युवा सेनेच्या वतीने देण्यात आले. या वेळी मावळ युवा सेना विस्तारक राजेश जी पळसकर, अनिकेत घुले,प्रतीक्षा ताई घुले ,शर्वरी जळमकर ,सागर शिंदे, अविनाश जाधव व पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके उपस्थित होते .

